शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव सप्ताहात सर्पमित्र पाठक यांना कोब्राचा दंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 11:11 IST

साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवीत असतानाच एका कोब्रा जातीच्या नागाने सर्पमित्र असलेल्या डॉ. किशोर पाठक यांना दंश केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वनविभागाच्या कार्यालयातच घडली. डॉ. पाठक यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

औरंगाबाद, दि. ८ : साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवीत असतानाच एका कोब्रा जातीच्या नागाने सर्पमित्र असलेल्या डॉ. किशोर पाठक यांना दंश केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वनविभागाच्या कार्यालयातच घडली. डॉ. पाठक यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

शनिवारी वन्यजीव सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम उस्मानपुरा येथील वनविभागाच्या कार्यालयात चालू होता. यावेळी डॉ. पाठक हे वनअधिकारी व कर्मचा-यांना साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवित होते.  सर्पमित्राने दोन दिवसांपूर्वी पकडून आणलेला कोब्रा नाग डॉ. पाठक यांनी प्रात्यक्षिकासाठी निवडला. साप कसा पकडावा व काय खबरदारी घ्यावी, यावर कर्मचा-यांना मार्गदर्शन सुरू होते. सापाला काठीच्या मदतीने अनेकवेळा पकडण्यात आले होते. त्यामुळे साप काहीसा चवताळला होता. डॉ. पाठक हे सापाचे तोंड पकडण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात सापाने त्यांच्या डाव्या हाताला दंश केला. 

रक्तस्राव अधिक...कोब्राचे विष शरीरात पसरू नये म्हणून पाठक यांनीदेखील खबरदारी घेतली. सर्पमित्र सुभाष राठोड यांनी त्वरित प्राथमिक उपचार केले. वन्य अधिका-यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले.  खूप रक्तस्रावही झालेला आहे. अतिदक्षता विभागात पाठक यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. वन्यजीव सप्ताहात सर्पमित्राला कोब्राचा दंश

त्यांनीच जीवदान दिलेल्या कोब्राचा दंश डॉ.पाठक यांनी गेल्या काही दिवसात अनेक विषारी सापांना पकडत त्यांना जंगलात सुरक्षित सोडले होते. मागे कुबेर गेवराई परिसरातील एका घरातून त्यांनी कोब्रा जातीचा साप पकडला होता. या कार्यक्रमात त्यांनी तोच कोब्रा प्रात्यक्षिकासाठी आणला होता.