शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:20 IST

घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने मृत पावणा-या रुग्णांची संख्याही दखलपात्र आहे.

ठळक मुद्दे शवविच्छेदन निवासी वैद्यकीय अधिकारी असलेले व्यक्तीच करीत असल्याचे समोर आले अहवालावर केवळ स्वाक्षरी करण्याचे काम त्यांची पत्नी करीत असल्याचे दिसून येते.

- राजेश भिसे

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने मृत पावणा-या रुग्णांची संख्याही दखलपात्र आहे. या मृतांचे शवविच्छेदन निवासी वैद्यकीय अधिकारी असलेले व्यक्तीच करीत असल्याचे समोर आले असून, अहवालावर केवळ स्वाक्षरी करण्याचे काम त्यांची पत्नी करीत असल्याचे दिसून येते. पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारीच शवविच्छेदन करीत असल्याचे मंगळवारी पाहणीदरम्यान दिसून आले. यानिमित्ताने घाटी रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश आणि बुलडाणा आदी जिल्ह्यांतून रुग्ण येतात. विविध विभागांमार्फत रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते. अपघात इमारतीमध्ये दररोज अपघातग्रस्त वा नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तींना दाखल केले जाते. अत्यवस्थ रुग्णासही दाखल करून घेतले जाते. उपचारास प्रतिसाद मिळाला तर या रुग्णास जीवदान मिळते. मात्र, प्रतिसाद न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होते. मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्यास शवविच्छेदन अहवालातून त्याचे कारण स्पष्ट केले जाते.

घाटी रुग्णालयात स्वतंत्र शवविच्छेदन विभाग कार्यरत आहे. यामध्ये कर्मचा-यांसह हाऊस आॅफिस पदावरील व्यक्ती कार्यरत आहेत. शवविच्छेदन करण्याचे काम हाऊस आॅफिस पदावरील व्यक्तीचे असते; पण या पदावरील महिला ही शवविच्छेदन न करता त्यांचे पतीच ते करीत असल्याचे मंगळवारी दिसून आले. डॉ. विकास राठोड हे घाटी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी राठोड या हाऊस आॅफिस म्हणून कार्यरत आहेत.

शवविच्छेदन प्रक्रियेत डॉ. अश्विनी राठोड यांचा मंगळवारी कुठेही सहभाग दिसून आला नाही. शवविच्छेदन अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी त्या सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात आल्या, तर मंगळवारी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत जवळपास ७ ते ८ मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. ते कोणी केले, अशी विचारणा शवविच्छेदन विभागातील कर्मचा-यांकडे केली असता त्यांनी डॉ. विकास राठोड यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. ते निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना शवविच्छेदन कसे करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.घाटी रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ कसे?गत चार ते पाच महिन्यांपासून घाटी रुग्णालयात डॉ. विकास राठोड हेच मृतांचे शवविच्छेदन करीत असून, शवविच्छेदन अहवालावर स्वाक्षरी मात्र त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी राठोड करीत आहेत. या प्रकाराबाबत घाटी रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ कसे राहू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कर्तव्यावर असताना शवविच्छेदननिवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून मंगळवारी डॉ. विकास राठोड हे कर्तव्यावर असताना शवविच्छेदन करण्यास ते कसे गेले, हे एक कोडेच आहे. फॉरेन्सिक विभागाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असला तरी सध्या जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकारी पदाची आहे. या पदावरील व्यक्ती शवविच्छेदन करू शकते का, याचे उत्तर घाटी रुग्णालय प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरजशवविच्छेदन विभागाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सीसीटीव्हीचे मंगळवारचे फुटेज तपासून असे प्रकार रोखण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांतून होत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरDeathमृत्यू