शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र विरुद्ध राज्यसरकार शीतयुद्ध; भूसंपादनाअभावी रखडले औरंगाबादच्या विमानतळाचे रुंदीकरण

By विकास राऊत | Updated: July 23, 2022 15:34 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी सुमारे ५०० कोटी रुपये लागण्याचा अंदाज

- विकास राऊतऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी रुंदीकरणावरून केंद्र विरुद्ध राज्यसरकार असे शीतयुद्ध सुरू झाल्याच दिसते आहे. मे महिन्यात रुंदीकरणाचे अलायन्मेंट बदलण्यापर्यंत येऊन थांबलेल्या प्रकरणात आता नवीन माहिती पुढे आली आहे. राज्यसरकाने जमीन अधिग्रहण करून न दिल्यामुळे विमानतळाचे विस्तारीकरण रखडले आहे. विस्तारीकरणाबाबत लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी सुमारे ५०० कोटी रुपये लागण्याचा अंदाज असून, रुंदीकरणात जाणाऱ्या मालमत्ता वाचविण्यासाठी अलायन्मेंट बदलण्याचा निर्णय होऊनही दोन महिने झाले आहेत. त्यामुळे ३५ एकर जागा कमी करून, १४७ एकरामध्ये विमानतळ धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे.जानेवारी, २०२१ पासून विस्तारीकरणाचा मुद्दा चघळला जातो आहे. नोव्हेंबर, २०२१ मध्ये जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडे भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविला हाेता. त्यानंतर, मे, २०२२ मध्ये रुंदीकरणासाठी समिती गठीत करण्यात आली. चिकलठाणा, मुकुंदवाडी, मूर्तिजापूर या भागांतील १४७ एकरासाठी बाधित मालमत्तांचे मूल्यांकन संबंधित विभागाकडून घेऊन त्याचे प्रस्ताव सादर करण्याचे ठरले होते. चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी येथील १८३ एकर जमीन संपादित करण्याच्या पहिल्या प्रस्तावात १,२०० हून अधिक मालमत्ता बाधित होत असल्याचे पाहणीअंती समोर आले होते. आता मालमत्ता वगळून भूसंपादन होणार आहे.

८२५ मीटर लांबीची धावपट्टीविमानतळ धावपट्टीसह टॅक्सी रन-वेसाठी मोठी जमीन लागणार आहे. चिकलठाणा येथील गट नं. ४१०, ४१४, ४१५, ४१६, ४१७ आणि ५५५ मध्ये मोजणीअंती सीमांकन झाले आहे. सध्या विमानतळाची धावपट्टी ९ हजार ३०० फूट म्हणजेच २ हजार ८३५ मीटर आहे. १२ हजार फुटांपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून, २,७०० फुटांसाठी भूसंपादन करावे लागत आहे. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने करण्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आला आहे.

विमानतळ रुंदीकरणासाठी समितीजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासन आदेशाने समिती गठीत केली आहे. समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले, अद्याप जागा ताब्यात आलेली नाही. समितीची एक बैठक झाली आहे. समितीमध्ये उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे हे सदस्य, तहसीलदार ज्योती पवार या सदस्य सचिव आहेत. विमानतळ निदेशक डी.जी. साळवे, नगररचना विभागाचे एस.एस. खरवडकर, टीएलआरचे उपअधीक्षक दुष्यंत कोळी, मनपाचे अभियंता देशमुख हे सदस्य आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन