शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

शेत का विकायचं? कृषी पर्यटन केंद्र थाटून लाखोंत कमावायचं ! काय आहे योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:00 IST

कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या सुमारे ३० टक्के अनुदान शासनाकडून मिळते.

छत्रपती संभाजीनगर : शेतात पर्यटकांना आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणारी कृषी पर्यटन केंद्र योजना पर्यटन विभागाने आणली आहे. त्याअंतर्गत राज्य सरकारने कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी, मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणे तयार केली आहेत.

काय आहे कृषी पर्यटन केंद्र?कृषी पर्यटन योजनेंतर्गत शेतीशी संबंधित व्यवसायांना पर्यटनाशी जोडणारी जागा होय. तेथे पर्यटकांना शेतीशी निगडीत काम, ग्रामीण आणि निसर्ग जीवनाचा आनंद घेता येतो. यातून पर्यटकांना आनंद आणि शेतकऱ्यांना पैसे मिळतात.

पर्यटक तुमची शेती कसणार!शेतीची आवड असलेले शहरी व्यक्ती कृषी पर्यटनाला पसंती देतात. हे पर्यटक हे त्यांच्या आवडीनुसार शेतात काम करतात. शेती मशागतीपासून ते लागवड, उत्पादन, माल पॅकिंग आदी कामे ते आवडीनुसार करतात.

केंद्रांसाठी शासनाचे कोणते लाभ मिळतात?राज्य सरकारकडे नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी शासनाकडून ३० टक्के अनुदान देण्यात येते. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग आणि सहकारी बँकांकडून १० टक्के व्याजाने कर्जही उपलब्ध हाेते.

नोंदणी कुठे अन् कशी करायची?कृषी पर्यटन केंद्रासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. सोबत अर्जदाराच्या शेतीचा सातबारा, वीज बील, नोंदणी शुल्क भरून, अन्य आवश्यक परवाने सादर करावे लागते.

निकष आणि कागदपत्रे कोणती?कृषी पर्यटन केंद्राच्या नोंदणीसाठी किमान १ एकर शेती असावी. नोंदणीसाठी अर्जदाराकडे सातबारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, वीज बिल आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.

अनुदान, कर्ज आणि इतर सुविधाकृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या सुमारे ३० टक्के अनुदान शासनाकडून मिळते. तसेच, विविध बँकांकडून यासाठी अत्यल्प दराने कर्जही उपलब्ध करण्यात येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ditch selling land, earn lakhs with agri-tourism: The plan!

Web Summary : Maharashtra's agri-tourism scheme boosts farmer income by connecting tourism with agriculture. Farmers can register centers to receive guidance, subsidies (30%), and low-interest loans. Tourists enjoy rural life, and farmers earn through activities like farming, harvesting, and packaging. Minimum one-acre land needed for registration.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर