शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहारा ऐवजी पीठले दिले, दारुड्या पतीचा पत्नीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 16:50 IST

गंभीर जखमी अवस्थेत विवाहितेने स्वतःची कशीबशी सुटका करून तेथून पळ काढत शेजारी आश्रय घेतल्याने वाचला जीव.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड ( औरंगाबाद ) : मजुरी करणाऱ्या पत्नीने मांसाहारा ऐवजी जेवणात पिठले केले म्हणून दारुड्या पतीने तिला काठीने बेदम मारहाण केली. ऐवढ्यावर न थांबता रक्तबंबाळ अवस्थेतील पत्नीला त्याने फासावर लटकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील राहिमाबाद येथे शुक्रवारी रात्री घडली. गंभीर जखमी अवस्थेत विवाहितेने स्वतःची कशीबशी सुटका करून तेथून पळ काढत शेजारी आश्रय घेतल्याने जीव वाचला. विवाहितेवर सध्या सिल्लोड  रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री विवाहितेने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात पती नागेश गोपीनाथ शिंदे विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

कौशल्याबाई नागेश  शिंदे ( २५, रा.रहिमाबाद ) असे गंभीर जखमी विवाहितेचे नाव आहे. कौशल्याबाई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती नागेश मला नेहमी दारू पिऊन मारहाण करतो, मी मजुरी करते तो काही कमाई करत नाही. मात्र, माझ्यावर रुबाब करतो. शुक्रवारी रात्री नागेश दारू पिऊन आला आणि मला म्हणाला, जेवणात मटण का केलं नाही. मी त्यांना सांगितले की, माझ्याकडे पैसे नव्हते. तुम्ही मटण आणून द्या, मी करून देते. पैसे नाही तर मटण कसे आणू, असे म्हणताच पती नागेशने काठीने बेदम मारहाण केली. 

रक्तबंबाळ अस्वस्थेत पडलेली असताना पती नागेशने मृत आहे कि जिवंत याची खात्री केली. जीव गेला नाही हे पाहताच मला फासावर लटकावण्याचा प्रयत्न केला. पण कसाबसा प्रतिकार करत मी घरातून पळाले व शेजारील नागेश चिंचपुरे यांच्या घरात आश्रय घेतला. यामुळे माझा जीव वाचला. पती दारुडा असून काही करत नाही. सतत मारहाण करतो यामुळे दोन्ही मुलांना शिक्षणासाठी माहेरी ठेवले असल्याचे जखमी विवाहिता कौशल्याबाई यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी