शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रामजन्मभूमीप्रमाणेच महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का नाही? भीमराव आंबेडकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:49 IST

देशभरात सध्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : बुद्धगयेतील महाबोधी महाविहार हा केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील बौद्धांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. रामजन्मभूमीप्रमाणे निकष लावून महाविहार बौद्धांच्या हवाली का केले जात नाही, त्यासाठी पुराव्यांची मागणी का केली जाते, असा सवाल अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी येथे उपस्थित केला.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या आदर्श बौद्ध समाजाच्या निर्मितीसाठी धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्याला आपले आयुष्य वाहून घेतलेले भदन्त करुणानंद थेरो यांचा महाथेरो विधान समारंभ आणि कठीण चिवरदान धम्मसोहळा रविवारी (दि.१९) नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला.

या धम्मसोहळ्याचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते म्हणाले, देशभरात सध्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सम्राट अशोकांनी ज्या महाविहाराची निर्मिती केली, ज्या बुद्धगयेत तथागत भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली ते ऐतिहासिक स्थळ फक्त आणि फक्त बौद्धांचेच आहे. ते अन्य दुसऱ्या कोणाचेही असू शकत नाही. ब्रिटिश इतिहासकारांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास लिहून ठेवला आहे. चिनी प्रवाशांनीही या ऐतिहासिक भूमीची नोंद करून ठेवली आहे. परंतु, बुद्धगयेतील महाबोधी महाविहारावर बौद्धांनी हक्क सांगितल्यानंतर त्याचे पुरावे लागतील, असे सांगण्यात आले. 

अयोध्येतील रामजन्मभूमीत उत्खनन सुरू करण्यात आले तेव्हा बौद्ध धम्माशी संबंधित अवशेष सापडले. त्याच आधारे आम्ही रामजन्मभूमी बौद्धांची असल्यामुळे ती बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आणि आमच्या वकिलालाच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. देशात कोणत्या जाती-धर्माचा पक्षकार आहे, हे पाहून न्याय दिला जात आहे, असेही भीमराव आंबेडकर म्हणाले.

कोणत्याही धम्मसोहळ्यात भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसोबतच राजा सम्राट अशोकाचीही प्रतिमा ठेवली पाहिजे आणि सम्राट अशोकाची जयंतीही तेवढ्याच थाटामाटात साजरी करण्यात आली पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.

देशात धम्म परिवर्तनाची नांदीदेशात धम्म परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. जेवढ्या गतीने आपण पुढे जात आहोत, तेवढ्यात ताकदीने आपणाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार धर्मांतर हा मूलभूत हक्क आहे. परंतु, धर्मांतर विरोधी कायदे करून धर्मांतराच्या घटनात्मक मूलभूत हक्काचे उल्लंघन करण्यात येत आहे. आता देशात जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. त्यावेळी धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात न विसरता तुमची जात लिहा. तुम्ही महार, मातंग, चांभार या जातीतून बौद्ध धम्म स्वीकारला असेल तर तुमची जात आवश्य नोंदवा आणि देशात धम्मक्रांती गतीमान आहे, हे दाखवून द्या. धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात तुमची जात लिहिल्याशिवाय बौद्धधर्मियांची नेमकी संख्या कळणार नाही, असे भीमराव आंबेडकर म्हणाले.

यावेळी भदन्त शरणानंद महाथेरो, भदन्त डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदन्त बोधीपालो महाथेरो, भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू विशुधानंदबोधी महाथेरो, भदन्त विनय रक्खित महाथेरो, भदन्त सुमनवन्नो महाथेरो, भदन्त प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भदन्त एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, भिक्खू धम्मबोधी महाथेरो यांच्यासह या धम्मसोहळ्याचे निमंत्रक प्रा. प्रदीप रोडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, स्मार्टसिटीचे उपायुक्त रविंद्र जोगदंड, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, आंतरराष्ट्रीय गायक पावा, सा.बां. वि. चे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो उपासक, उपासिका सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Why not hand over Mahabodhi Temple like Ram Janmabhoomi?

Web Summary : Bhimrao Ambedkar questions why Mahabodhi Temple isn't given to Buddhists like Ram Janmabhoomi. He highlights historical evidence and criticizes demanding proof of Buddhists' claim. He also spoke against anti-conversion laws and emphasized recording caste in the census.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर