शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जबरदस्त! गोव्याला कशाला? गोदावरी नदीत आता घेता येणार क्रूझ पर्यटनाचा आनंद

By संतोष हिरेमठ | Updated: July 22, 2024 14:20 IST

परवडणारे क्रूझ पर्यटन करणार विकसित : पर्यटकांना मिळणार आगळावेगळा अनुभव

छत्रपती संभाजीनगर : क्रूझ म्हटले की लगेच सर्वांच्या नजरेसमोर गोवाच येतो. गोवा हे सुंदर समुद्रकिनारे, समुद्री खाद्यपदार्थ, नाइटलाइफ आणि क्रूझ पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात समुद्रात मोठमोठ्या जहाजातून प्रवास करणे हा पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव असतो. याच क्रूझ पर्यटनाचा आनंद आता आगामी काही दिवसांत गोदावरी नदीत घेता येणार आहे. तेही अगदी परवडणाऱ्या दरात.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन धोरण २०२४ तयार करण्यात आले आहे. यात राज्यातील सागरी किनारपट्टीचा पर्यटनासाठी वापर करण्यात येणार असून, क्रूझ पर्यटन निर्माण करण्याचे धोरणही त्यात समाविष्ट आहे. मात्र, केवळ समुद्र किनारेच नाहीत, तर यात राज्यातील काही नद्यांवरही क्रूझ पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. यात गोदावरी नदीचा समावेश करण्यात आला आहे. परवडणारे क्रूझ पर्यटन विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

क्रूझ पर्यटन म्हणजे काय?क्रूझ पर्यटन म्हणजे मोठ्या बोटीतून, म्हणजेच क्रूझ जहाजातून प्रवास करणे. हा प्रवास मनोरंजन, विश्रांती आणि विविध स्थळांची सफर करण्यासाठी केला जातो. क्रूझ जहाजांवर विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध असतात. जसे की स्विमिंग पूल, थिएटर, कॅसिनो, जिम, स्पा, आणि लाइव्ह शो. प्रवाशांसाठी विविध खेळ, कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. क्रूझ पर्यटनासाठी विविध प्रकारचे क्रूझ जहाजे आणि पॅकेजेस उपलब्ध असतात. प्रवाशांना आपल्या आवडीप्रमाणे आणि बजेटप्रमाणे योग्य पॅकेज निवडावे लागते. गोवा, मुंबईत अशा प्रकारचे क्रूझ जहाजे अधिक पाहायला मिळतात.

अशी वाहते गोदावरी...गोदावरी नदी राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर येथून उगवते. ती दख्खन पठार ओलांडून पश्चिमेकडून पूर्व घाटापर्यंत वाहते. गोदावरी नदीची लांबी १ हजार ४६५ कि.मी. आहे. त्याचा मुख्य प्रवाह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडसह तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहतो आणि शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतो.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी