छत्रपती संभाजीनगर : शहरात पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होते. मागील दोन ते तीन वर्षांमधील आकडेवारी पाहू गेल्यास जुलै महिन्यापासून संशयित आणि पॉझिटीव्ह रुग्ण वाढू लागतात. यंदा मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. डेंग्यूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेनेही व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. धडक ॲबेट ट्रिटमेंट मोहीम, घरोघरी जाऊन डास अळ्या शोधण्यात येत आहेत. औषध फवारणी सुरू आहे.
शहरातील खासगी, महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सर्दी, खोकला, सतत ताप असे रुग्ण येण्यास सुरुवात झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून सातत्याने ताप उतरत नसलेल्या काही रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांची नोंद मनपाकडे नाही. खासगी रुग्णालयांना, डेंग्यूसदृश आजार असेल तर मनपाला कळवा असे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढते. एडिस डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. तो साठलेल्या पाण्यात प्रजननासाठी योग्य वातावरण मिळवतो.
६८ हजार घरांचे सर्वेक्षणमनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली सर्व झोनचे कर्मचारी एकत्र करून यंदाही व्यापक मोहीम २६ मे ते ३ जूनपर्यंत राबविण्यात आली. यामध्ये ६८ हजार ९१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. १ लाख ५१ हजार ५२९ कंटेनर तपासण्यात आले. यापैकी २ हजार ६९० घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या. १७१० कंटेनर्स रिकामे केले. ६४ हजार ४१४ घरांमध्ये ॲबेट टाकण्यात आले.
डेंग्यूची आकडेवारी वर्षनिहायवर्ष--संशयित रुग्ण- पॉझिटिव्ह रुग्ण२०२२---२३२---------६१२०२३----५०४-------१६२२०२४----३१४---------५३२०२५----२७२---------०८ (जूनपर्यंत)
नागरिकांनीही काळजी घ्यावीडेंग्यूसह अन्य आजार पसरू नयेत, यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडून यंदाही व्यापक प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी आठवड्यातून एकदा घरात ड्राय डे पद्धत अवलंबली, तर डासांची उत्पत्ती अजिबात होणार नाही. घरात डास येणार नाहीत, याची व्यवस्था करावी.- डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.