शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘वडिलांना दारू का देता ?’ जाब विचारत अवैध विक्रेत्याचा केला खून; आरोपीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:03 IST

दंडाची रक्कम मयताच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचाही आदेश

छत्रपती संभाजीनगर : ‘वडिलांना दारू का देता ?’ असा जाब विचारून, अवैधरीत्या देशी दारू विक्रीचा व्यवसाय करणारा बबन देवमन कुचे याच्यावर चाकूने वार करून खून करणारा करण नामदेव बनकर (दोघेही रा. राजाराय टाकळी ता. खुलताबाद) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी दि.१८ सप्टेंबर रोजी जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड ठोठावला.

दंडाची रकम मयताच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

काय होती घटना?मयत बबन यांची पत्नी दीपाली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शेतकरी आहेत. शेतीचे उत्पन्न अपुरे असल्याने त्यांनी बेकायदेशीर देशी दारूविक्री सुरू केली होती. गावातील नामदेव बनकरसह अनेकजण त्यांच्या घरी दारू घेण्यासाठी येत होते. १० मे २०२३ रोजी सायंकाळी दारू प्याल्यानंतर नामदेव बनकरने घरी जाऊन पत्नी व मुलांना शिवीगाळ करून भाजीत पाणी टाकले. यामुळे त्याचा मुलगा करण संतापला. त्याने घरातील कुऱ्हाडीने बबन कुचेंवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बबनने कुऱ्हाड हिसकावून घेतली. करणने दगडफेक करून धमक्या दिल्या व निघून गेला. काही वेळाने करण व त्याचा अल्पवयीन भाऊ पुन्हा बबनच्या घरी गेले. तुम्ही आमच्या वडिलांना दारू का देता? असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. करणने पाठीमागून बबनच्या पाठीवर धारदार चाकूने वार करून खून केला. याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खटल्याची सुनावणी व शिक्षातत्कालीन पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बी. आर. लोया यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी फिर्यादी दीपाली कुचे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सुनावणीअंती न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर