शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अटकेनंतर पोलिसांनी फोन का केला नाही? मृत्यूनंतर नंबर मिळाला का? सोमनाथ यांच्या आईचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:05 IST

आधी कळविले असते, तर आज माझं लेकरू जिवंत असतं.: मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि नातेवाइकांना घाटी परिसरात भावना अनावर झाल्या; शवविच्छेदनगृहासमोर बसून राहिले मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय.

छत्रपती संभाजीनगर : सोमनाथला अटक केल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना फोन का केला नाही. अटक केल्याची माहिती नातेवाइकांना देणे, हे पोलिसांचे कर्तव्य होते; परंतु त्यांनी कळविले नाही. थेट मृत्यू झाल्याचे कळविले. तेव्हा आमचे नंबर कसे सापडले, असा सवाल मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी उपस्थित केला.

घाटीत रविवारी रात्री सोमनाथचे पार्थिव शवविच्छेदनासाठी दाखल झाले. मात्र, नातेवाइकांअभावी शवविच्छेदन रात्री झाले नाही. साेमनाथ यांची आई आणि नातेवाईक सोमवारी पहाटे घाटीत आले. त्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली. शवविच्छेदन सुरू असताना विजयाबाई आणि कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रोज फोनवर ‘आई तू कशी आहेस, आई तू जेवलीस का’ असे विचारणा करणारे लेकरू कायमचे गप्प झाल्याचे म्हणत विजयाबाई यांना अश्रू अनावर झाले. हे दृश्य पाहून उपस्थित हळहळले.

सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी उपस्थित केलेले प्रश्न- सोमनाथ हा विधिचे (लाॅ) शिक्षण घेत होता. एक शिक्षित विद्यार्थी दगडफेक करू शकतो का?- सोमनाथला अटक केल्यानंतर त्याच्याकडील फोन काढून घेतले. अटकेची माहिती कळविणे हे पोलिसांचे कर्तव्य होते. पण का कळविले नाही?- सोमनाथला का मारहाण करण्यात आली?- मृत्यू झाल्यानंतर मृतदेह परभणीला की, छत्रपती संभाजीनगरला आहे, याची वेळीच योग्य माहिती का देण्यात आली नाही?

अटक केल्यानंतर संपर्क नाही, थेट मृत्यूनंतर फोनसोमनाथला अटक केल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला नाही. मात्र, मृत्यूनंतर फोन केला. पोलिसांनी आधीच संपर्क साधला असता तर माझे लेकरू जिवंत राहिले असते, असे विजयाबाई म्हणाल्या.

दोषींवर कारवाईची मागणीसोमनाथला मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. सोमनाथला मारहाण का करण्यात आली, याची चौकशी करावी, अशी मागणी विजयाबाईंनी केली.

घाटीत जोरदार घोषणासकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने परभणीकडे रवाना झाले. रुग्णवाहिकेसोबत मोठा पोलिस बंदोबस्त होता. घाटीत शवविच्छेदनगृह परिसरात आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली. यावेळी ‘सोमनाथ अमर रहे’ अशा घोषणांसह पोलिसांच्या विरोधातील घोषणाही देण्यात देण्यात आल्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरparabhaniपरभणी