शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

औषध दुकान कोणाचे? प्रत्यक्षात चालवितो कोण? वर्षभरात ५११ मेडिकल्सची तपासणी

By साहेबराव हिवराळे | Updated: February 8, 2024 19:21 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्सचे परवाने देण्यात आलेले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात ५११ मेडिकल्सची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात केली. त्यातून चार लायसन्स रद्द केले. ७१ परवाने निलंबित केले. बटन नशेच्या गोळ्या, तसेच इतर कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्सछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्सचे परवाने देण्यात आलेले आहेत. त्यात तालुक्यानुसार नियमित तपासणी करण्याचा भाग हा एफडीए विभागाचा असतो. त्यात गैर काही आढळल्यास त्यास नोटीस दिली जाते किंवा त्याच्या त्रुटीनुसार दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येते.

वर्षभरात दोन हजार मेडिकल्सची तपासणीगत वर्षभरात ५११ मेडिकल्सवर इन्पेक्शन एफडीएच्या पथकांने तपासणी केली असून, त्यानुसार जो दोषी आढळला असल्यास त्यास कारवाईस सामोरे जावे लागते. वर्षभरात पथकाने तपासणी नियमितप्रमाणे करण्यात आलेली आहे. खेड्यात तालुकास्तरावर असलेल्या मेडिकलवर दवा गोळ्या घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा गोळ्या घेण्यासाठी अखेर शहरात मेडिकल गाठण्याशिवाय पर्याय नसतो.

चार मेडिकल्सचा परवाना रद्दवारंवार दोषी आढळलेल्या मेडिकलला सूचना देऊनही ते मेडिकल चालक नियमांची पायमल्ली करीत असेल तर अखेर त्या दुकानचालकांना दोषी धरून परवाना रद्द करण्याशिवाय पर्याय नसतो. शहरात असे चार परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. सूचना देऊनही त्या गोष्टीचे पालन होत नसल्याने अखेर कारवाईशिवाय पर्यायदेखील राहत नाही.

परवाना एकाचा, चालवितो दुसराचअनेक दुकानात परवाना चालक हा वेगळाच असून, मात्र त्या ठिकाणी दुकान चालविणारा ही व्यक्ती मात्र दुसरीच असल्याचे हे निदर्शनास आलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजीच्या दृष्टीने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

गैरप्रकार आढळ्यास कारवाई निश्चित होणारच...नागरिकांच्या जीवन मरणाशी कोणी खेळत असेल तर त्याकडे लक्ष देऊन कारवाई करावीच लागते. त्याशिवाय तो कायद्याचे पालन करीत नाहीत. प्रथम त्या व्यक्तीला समजावून सांगूनही चुका करीत असेल तर त्यास कारवाईला सामोरे जावेच लागेल.- बळिराम मरेवाड, अन्न व औषध प्रशासन अधिकारी.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद