शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षानंतर आता सभापती कोण होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:46 IST

काँग्रेसच्या सहा बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात

ठळक मुद्देफोडाफोडीला वेग; बांधकाम सभापतीवर सर्वांचा डोळा

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता ४ विषय समित्यांचे सभापती कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बांधकाम व वित्त, शिक्षण व आरोग्य,  महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी मंगळवारी (दि.१४) निवडणूक होणार आहे. यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतात की बाजूने याकडेही लक्ष लागले आहे. याच वेळी सत्तार समर्थक काँग्रेसच्या ६ सदस्यांनाही पक्षाने व्हीप जारी केल्यामुळे विरोधात मतदान केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचेही काँग्रेसच्या गटनेत्यांनी स्पष्ट केले.

जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक ६ सदस्यांच्या बळावर भाजपशी हातमिळवणी करून निवडणूक लढविली. यात समसमान मते पडल्यामुळे काढलेल्या चिठ्ठीमध्ये काँग्रेसच्या मीना शेळके अध्यक्षा बनल्या. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे एल. जी. गायकवाड यांनी  शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी काजे यांचा ३२ विरुद्ध २८ असा पराभव केला होता. यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांना ‘गद्दार’ ठरविले. शेवटी हा वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिटविण्यात आला. खैरे व सत्तार यांनी हातात हात घेऊन वाद मिटल्याचे जाहीर केले.

यानंतर ४ विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात राज्यमंत्री सत्तार यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांचे ६ समर्थक हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्या ६ सदस्यांना काँग्रेसकडून कोणतेही पद मिळणार नाही. तसेच शिवसेनेच्या कोट्यात केवळ दोनच सभापतीपदे असल्यामुळे मूळ सदस्यांना डावलून या सहयोगी पक्षाच्या सदस्यांना सभापतीपद मिळणे कठीण आहे. त्याच वेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल आणि जि. प. गटनेते श्रीराम महाजन यांनी पक्षाच्या सदस्यांना व्हीप जारी केला आहे. याचे प्रगटन दैनिकात प्रकाशित केले आहे. व्हीप डावलणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सत्तार समर्थक गोपीचंद जाधव, सीमा गव्हाणे, मीना गायकवाड, केशवराव तायडे, धनराज बेडवाल आणि किशोर बलांडे या बंडखोर सदस्यांची गोची होणार आहे.

या सदस्यांनी पक्षविरोधी मतदान केल्यास सदस्य रद्द होण्याची कारवाईही केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष व गटनेत्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या ६ सदस्यांनी यापूर्वीही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा पक्षाचे उल्लंघन केल्यामुळे बडतर्फीची कारवाई करण्यास पक्षाला अधिक सोपे जाणार आहे. असे झाल्यास जि. प. च्या पदापासून अगोदरच वंचित राहावे लागलेल्या किशोर बलांडे यांच्यासह इतरांना सदस्यत्वापासूनही मुकावे लागण्याचीच अधिक शक्यता आहे.

फोडाफोडीला वेग; बांधकाम सभापतीवर सर्वांचा डोळाजि.प.च्या ४ विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी निवडणूक होत आहे. यात बांधकाम आणि वित्त समितीच्या सभापतीवर सर्वांचा डोळा आहे. हे पद शिवसेनेच्या वाट्याला येते की, काँग्रेसच्या हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसकडून श्रीराम महाजन यांनी मोर्चेबांधणी केली आहे. तर शिवसेनेकडून शुभांगी काजे, अविनाश गलांडे यांच्यासह इतर इच्छुक आहेत. भाजपकडूनही फोडाफोडी करून हे पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय सत्तार गटाकडून किशोर बलांडे इच्छुक असल्याचे समजते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदElectionनिवडणूक