शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा प्रकुलगुरू कोण होणार?; आज व्यवस्थापन परिषदेची बैठक

By राम शिनगारे | Updated: February 9, 2024 14:05 IST

प्रकुलगुरूपदासाठी पूण्याहून बंद लिफाफ्यात नाव येणार असल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक तब्बल तीन महिन्यांनी होत आहे. या बैठकीत विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदाच्या नावाला मंजुरी देण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. एकूण विषयपत्रिकेवर ७० विषय असून, ६६ व्या क्रमांकावर प्रकुलगुरूंच्या नावाला मंजुरीचा विषय ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरू आणि चार अधिष्ठातांची नियुक्ती केली होती. त्यात ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. वाल्मिक सरवदे यांना प्रकुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. मात्र, ४८ तास होण्यापूर्वीच त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यासाठी कुलगुरूंकडून तांत्रिक कारण देण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तसेच काही संघटनांनी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांची पुनर्नियुक्ती करण्याची मागणीही केली होती. त्याविषयी ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते. 

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रकुलगुरूपदासाठी डॉ. वाल्मिक सरवदे हे सर्वांत प्रबळ दावेदार आहेत. त्याशिवाय रसायनशास्त्राचे माजी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्या नावाला सत्ताधाऱ्यातील एका गटाचा पाठिंबा आहे तसेच पर्यावरणशास्त्राचे डॉ. सतीश पाटील, माजलगावच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे, प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव यांच्यापैकी कोणाच्याही नावाचा ऐनवेळी विचार केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

पुण्याहून नाव येणार असल्याची चर्चाप्रकुलगुरूपदासाठी पूण्याहून बंद लिफाफ्यात नाव येणार असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षाच्या संबंधित विद्यापीठ विकास मंचच्या व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद आणि अधिसभा सदस्यांनी बुधवारी ऑनलाइन बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत प्रकुलगुरूंच्या नावावर चर्चा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुरुवारी रात्रीपर्यंत मंचच्या संबंधित अनेक सदस्य नावाविषयी अनभिज्ञ होते. पुण्याहून शुक्रवारी सकाळी नाव येईल, त्यानुसारच निर्णय होईल, असेही एका सदस्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद