शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औरंगाबाद जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण ? इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवडीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 13:11 IST

प्रक्रियेत हरिभाऊ बागडे यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे

ठळक मुद्दे२५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेशदादांचे निधन झाल्यामुळे अध्यक्षपदासाठी ही निवड होत आहे.दामूअण्णा नवपुते हे  बँकेचे गेल्या तीन महिन्यांपासून  प्रभारी अध्यक्ष आहेत.

औरंगाबाद : येत्या १३ जून रोजी होणाऱ्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. २०२० मध्ये बँकेच्या  विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभूमीवर ही निवड होत असली तरी अध्यक्ष होण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे अवघ्या सात- आठ दिवसांवर आलेल्या या निवडीत चुरस वाढली आहे.

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात हरिभाऊ बागडे यांच्यासारखे ज्येष्ठ आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असलेले एक बडे प्रस्थ आहे. ते औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचेही अध्यक्ष आहेत. विधानसभेचे अध्यक्ष, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आणि फुलंब्रीसारख्या ‘टफ ’ मतदारसंघाकडे द्यावे लागणारे लक्ष यातून हरिभाऊ बागडे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष होण्यात फारसे स्वारस्य नसेलही.

नानांना आग्रह होऊ शकतो..... हरिभाऊ बागडे यांची आर्थिक शिस्त सर्वपरिचित असल्याने व बँक व्यवस्थित चालायची असेल तर ‘नाना, तुम्हीच अध्यक्ष व्हा’ असा आग्रह होऊ शकतो. या एकूणच प्रक्रियेत हरिभाऊ बागडे यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे, एवढे नक्की. सुरेशदादा पाटील अध्यक्ष असतानाही स्वत: सुरेशदादा नानांना खूप महत्त्व देत असत व त्यांचा शब्द प्रमाण मानत असत. नाना सत्तेत असल्याने बँकेची विविध कामे करून घेताना त्यांची सतत मदत होत असे. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेशदादांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवड होत आहे. नानांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दामूअण्णा नवपुते हे  बँकेचे गेल्या तीन महिन्यांपासून  प्रभारी अध्यक्ष आहेत. ते अत्यंत संयमी आहेत. कदाचित हरिभाऊ बागडे हे दामूअण्णा नवपुते यांच्यासाठीही आग्रही असू शकतात; पण उर्वरित इच्छुकांमध्येही मोठी नावे आहेत. 

रामकृष्णबाबा, भुमरे, पालोदकर, नितीन पाटील इच्छुकरामकृष्णबाबा पाटील, आमदार संदीपान भुमरे, प्रभाकर पालोदकर व सुरेशदादा पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील हे अध्यक्षपदासाठी प्रबळ उमेदवार असून, १३ तारीख जसजशी जवळ येईल, तसतशी जुळवाजुळवीला गती प्राप्त होणार आहे. सुरेशदादांचा वारस म्हणून नितीन पाटील यांना बिनविरोध अध्यक्ष करण्याची शक्यता फारशी दिसत नाही. रामकृष्णबाबांचे संचालकपद मध्यंतरी रद्द झाले होते. आता त्यांना धरून संचालकांची संख्या १९ होते. तेच अध्यक्षाची निवड करणार आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयातील संचालक मंडळाच्या सभागृहात सकाळी ११.३० वा. विभागीय सहनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया सुरू होईल. ११.३० ते १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज भरले जातील. नंतर छाननी होऊन निवड प्रक्रिया सुरू होईल. 

असे आहेत संचालक....हरिभाऊ बागडे, दामूअण्णा नवपुते, नंदकुमार गांधीले, आ.संदीपान भुमरे, अंकुशराव रंधे, मंदाबाई माने, रंगनाथ काळे, अभिजित देशमुख, प्रभाकर पालोदकर, अशोक मगर, पुंडलिक जंगले, वर्षा काळे, किरण पाटील डोणगावकर, जावेद पटेल, बाबूराव पवार, नितीन पाटील, डी. एस. गायकवाड, आ. अब्दुल सत्तार व रामकृष्णबाबा.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक