शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

औरंगाबादेत महायुतीच्या उमेदवाराची उत्सुकता शिगेला; भुमरेंसह विनोद पाटील यांनी घेतले अर्ज

By विकास राऊत | Updated: April 20, 2024 11:19 IST

नाशिकसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला. मात्र औरंगाबादचा कायम आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मंत्री संदीपान भुमरे यांना मुख्यमंत्र्यांनी लढण्याचा ‘कानमंत्र’ दिल्याचे सांगितले जाते, परंतु त्यांच्या नावाची घोषणा का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्यासह विनोद पाटील आदींनी उमेदवारी अर्ज विकत घेतले.

नाशिकसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला. मात्र औरंगाबादचा कायम आहे. ही जागा शिंदेसेना लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, पण उमेदवार कोण? हा प्रश्न कायम आहे. मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी अपेक्षित होती. गेल्या दोन दिवसापासून भुमरे मुंबईत तळ ठोकून आहेत. भुमरे यांचे नाव पुढे आल्याने स्थानिक भाजपा नेत्यांनी देखील जागेसाठी असलेला आग्रह सोडून दिला आहे.

यांचे अर्ज दाखल....बहुजन महापार्टीकडून मंदा खरात, सुरेश फुलारे, खान एजाज महेमूद मो. बिस्मिल्लाह खान, खाजा असिम शेख यांनी अपक्ष, तर हिंदुस्तान जनता पार्टीतर्फे बबनगीर गोसावी यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पदाधिकाऱ्यांचे लाॅबिंग...भाजपातील काही जणांनी विनोद पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी लॉबिंग केले. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. परंतु त्यांच्या लॉबिंगला वरिष्ठांकडून काहीही दाद मिळाली नाही. उलट पक्षशिस्तीचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण लोकसभा निवडणुका होईपर्यंत यावर काहीही निर्णय घ्यायचा नाही, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४