शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल सेवेचे नियंत्रण कुणाकडे; कोट्यवधींची उलाढाल मात्र कारभार हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 17:50 IST

ग्राहक संख्या, वसुलीचे रेकॉर्ड ट्रायच्या आधिपत्याखाली 

ठळक मुद्दे रक्कम अदा करूनही सेवा मिळत नसल्यामुळे ग्राहक संतापले आहेत. 

औरंगाबाद : महापालिकेने मोबाईल कंपन्यांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी टॉवर्स सील करण्याची मोहीम हाती घेऊन चार दिवस झाले आहेत. या काळात शहरातील २०० हून अधिक मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स सील करण्यात आल्याने दररोज ७ ते ८ लाखांपर्यंत फोन ट्रान्झॅक्शन्स थांबले आहे. मोबाईल ग्राहकांची नेटवर्कअभावी कुचंबणा होत असून, विविध कंपन्यांकडून प्रीपेड आणि पोस्टपेड सेवा घेण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपयांची रक्कम अदा करूनही सेवा मिळत नसल्यामुळे ग्राहक संतापले आहेत. 

याबाबत तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न असून सगळा कारभार हवेत असल्याप्रमाणे झाले आहे. महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ट्रायचे कार्यालय बंगळुरू येथे आहे, तर मुंबई, पुणे एक उपकार्यालय असल्याचे टेलिफोन रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)च्या संकेतस्थळावर दिसते आहे. राज्यातील सहा विभागांतील मोबाईल ग्राहकांची संख्या, त्यातून बिलापोटी मिळणारी रक्कम किती, याची सगळी माहिती ट्रायच्या प्रादेशिक कार्यालयाकडेच मिळेल, बीएसएनएलकडेदेखील याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुतांश कंपन्यांनी  मोबाईल सेवेसाठी लागणारी सर्व यंत्रणा आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून उभी केली आहे. त्यामुळे कंपन्यांना दरमहा मिळणारा महसूल किती, वार्षिक उलाढाल किती होती, त्या तुलनेत सेवा कशी मिळते, याची कुठलीही माहिती जिल्हा पातळीवर नाही. 

सात ते आठ कंपन्यांची सेवा रिलायन्स जीओ, बीएसएनएल, वोडाफोन, टाटा, आयडिया, एअरटेल व इतर काही कंपन्यांचे ५९५ मोबाईल टॉवर्स शहरात आहेत. या सर्व कंपन्यांचे मिळून सुमारे १५ लाखांच्या आसपास ग्राहक शहरात असल्याचा प्राथमिक अंदाज बीएसएनएलच्या सूत्रांनी वर्तविला. यापैकी ८० टक्के ग्राहक प्रीपेड सेवा घेणार आहेत, तर २० टक्के ग्राहक पोस्टपेड सेवा घेणारे असू शकतील. ट्रायच्या अखत्यारीत सर्व डाटा असल्यामुळे त्याबाबत ठामपणे काही सांगता येणार नाही. मोबाईल नेटवर्क, टॉवर्स सेवा याबाबत ट्रायने नियुक्त केलेल्या संस्थांचे प्रतिनिधी दर सहा महिन्यांनी देशभर पाहणी करून अहवाल देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबादInternetइंटरनेट