शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

व्हिस्कीने २०२३ मध्ये वाढवला महसूल, छत्रपती संभाजीनगरात साडेतीन हजार कोटींची रिचवली दारू

By सुमित डोळे | Updated: December 29, 2023 15:40 IST

राज्याच्या तिजोरीत जिल्ह्याने दिला कोट्यवधी महसूल : गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के वाढ

छत्रपती संभाजीनगर : मद्य विक्रीची परंपरा यंदा मोडीत काढत व्हिस्कीने (विदेशी दारू) यंदाच्या महसुलात सर्वाधिक वाटा वाढवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ११.५ टक्क्यांनी वाढ होत नऊ महिन्यांमध्ये ५२ लाख ७४ हजार २१० लिटर व्हिस्की रिचवली गेली. यात एकट्या ऑक्टोबरमध्ये ६ लाख ८७ हजार ५८८ लिटर व्हिस्कीचा खप झाला, तर जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत २७ % टक्क्यांनी वाढ होत बीअरची सर्वाधिक ५ लाख ५३ हजार ७८७ लिटर विक्री झाली.

राज्याच्या तिजोरीत मद्यनिर्मिती व खपाद्वारे सर्वाधिक महसूल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जमा होतो. यंदा विभागाचे वार्षिक ६ हजार ३१३ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्याने ८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांनी अवैध दारूविक्रीवर कारवाया केल्या. १,२२४ कारवायांमध्ये १,२३६ आरोपी पकडले गेले. परिणामी, दारूची अवैध विक्री करणाऱ्या ढाबा, हॉटेलचालकांनी बार लायसन्स घेण्यावर भर दिला. त्यातून ४९ बार वाढले.

अशी होते दारूनिर्मिती व विक्री

-गोदावरीचे पाणी मद्यनिर्मितीसाठी पूरक असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक कारखाने.-चिकलठाणा, वाळूज, गंगापूर, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत हे कारखाने.

-७ कारखान्यांमध्ये बीअर, तर ६ कारखान्यांमध्ये विदेशी मद्यनिर्मिती होते.-जिल्ह्यात ११५ देशी दारू दुकाने, ७४८ बार व ३५ वाइन शॉप.

काय सांगते आकडेवारी ? (लिटर मध्ये)वर्षे             देशी                         विदेशी बीअर वाइन२०२३ १,१०,५२,७१० ५२,७४,२१० ४८,८९,९९१ १,०४,००१२०२२ १,०६,९२,१५४ ४७,३२,३५१ ४४,६७,११० १,०८,९९८

वाइन विक्रीत यंदा घटजिल्ह्यात यंदा वाइन विक्रीमध्ये ४.६ टक्क्यांची आश्चर्यकारकरीत्या घट झाली. सर्वाधिक १४,०५३ लिटर वाइन ऑगस्ट महिन्यात रिचवली गेली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच सर्वाधिक वाइनविक्री झाली होती.

नोव्हेंबरमध्येच सर्वाधिक दारू विक्रीएप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात ३,४०९ कोटींचा मद्यविक्रीतून महसूल मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत १९४.३१ कोटींनी हा वाढला. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक ४७५.७३ कोटींची दारूविक्री झाली, तर त्या खालोखाल ४५७ कोटींची दारूविक्री झाली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग