शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढताना महापालिका पथक अन् पोलिसांवर दगडफेक,अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

By सुमित डोळे | Updated: February 21, 2024 12:24 IST

विश्रांतीनगर येथे मागील काही दिवसांपासून अतिक्रमण वाढत होते.

छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन जवळील विश्रांतीनगर येथील अतिक्रमण हटविताना आज सकाळी राडा झाला. महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर नागरिकांनी अचानक दगडफेक केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या सात ते आठ नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये महापालिका, पोलीस आणि नागरिकांमध्ये अतिक्रमण हटविण्यावरून आज सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यान वाद झाला. मागील अनेक दिवसांपासून या परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रम काढण्यासाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यानंतर आज सकाळी महापालिका पथक पोलिसांसह या ठिकाणी अतिक्रमण हटविण्यासाठी गेले. सुरुवातीला महापालिका पथकाने अतिक्रमण धारकांना कारवाईची माहिती दिली. त्यानंतर अनाउंसमेंट करण्यात आली. अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच अचानक नागरिकांनी विरोध करत प्रथम महापालिका पथक आणि त्यानंतर पोलिसांनावर दगडफेक सुरू केली. 

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगविले.  त्यानंतर पथकाने जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उध्वस्त केले आहे. सध्या परिस्थिति नियंत्रणात असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेकीत आठ पोलिस कर्मचारी, पोलिस निरीक्षक राजेश यादव जखमी झाले आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका