शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुठे कुठला उद्योग? काहीच कळेना रे! चिकलठाणा औद्योगिक परिसरात जायचे कसे रे भौ?

By साहेबराव हिवराळे | Updated: March 25, 2023 20:10 IST

चिकलठाणा उद्योजकांचा सवाल : अधिकारी केव्हा लक्ष देणार ?

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक परिसरातील विविध सेक्टरचे लेआऊट आणि कोणता कारखाना कुठे, असे दर्शविणारे फलक कोरे झाले असून, याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष असल्याने येणाऱ्यांना मात्र कारखाना शोधण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत.

चिकलठाणा एमआयडीसी ही जुनी औद्योगिक वसाहत असून, एकेकाळी अत्यंत भरभराटीस असलेल्या वसाहतीकडे आता दुर्लक्ष केले जात आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या मुकुंदवाडी, ओक्खार्ड टी पाॅइंट, घाडगे पाटीलजवळील कॉर्नर गॅस कंपनीसमोर, इ. प्रमुख ठिकाणी पथदर्शक फलकावरील नकाशांवरील अक्षरे, चिन्हे मिटली आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या मालवाहू चालकांना तसेच अभ्यागतांना कारखाने व कार्यालय सापडत नाही. एमआयडीसीच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, वरिष्ठांशी बोलून फलकाविषयी पुढील निर्णय घेतला जाईल.

कारखान्याचे लोकेशन दर्शविणारे बोर्ड रंगवा...चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत येणाऱ्यांना कारखाना तसेच कार्यालयाचे लोकेशन तसेच सेक्टर दर्शविणारे बोर्ड असल्यास अधिकचे इंधन जाळण्याची गरज पडत नाही. दिवसा तर कुणीही पत्ता सांगते; परंतु रात्री अडचणीला तोंड द्यावे लागते. त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.- मधुकर खिल्लारे, कामगार नेता

चिकलठाणा वसाहतीत साईनबोर्ड लावा..नुकतीच जी-२०च्या स्वागतासाठी शहर सजविले होते, याच जालना रोडवरून चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावर तसेच विविध सेक्टरला नकाशाफलक लावण्यात आलेले आहेत. तसेच ग्लोसेमचे साइनबोर्ड लावून सेक्टरचे नकाशे दाखवावेत; म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना गुगल मॅप सतत पाहण्याची गरज पडणार नाही. याविषयी एमआयडीसीला पत्र देणार आहोत.- राहुल मोगले, सचिव, मसिआ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसी