शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खैरलांजीच्या वेळी सुप्रिया सुळे कुठे होत्या ?; अंजली आंबेडकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 17:39 IST

वंचित बहुजन आघाडीच्या महिला अत्याचारविरोधी परिषदेत सवाल 

ठळक मुद्दे महिलांवरील अत्याचाराचे मूळ जातिव्यवस्थेत आहे.स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत भारताचा जगात खूप खालचा क्रमांक

औरंगाबाद : अगदी अलीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला अत्याचारप्रकरणी मोर्चा काढणाऱ्या सुप्रिया सुळे खैरलांजी प्रकरण घडले तेव्हा कुठे होत्या, असा खडा सवाल मंगळवारी अंजली आंबेडकर यांनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने आयोजित केलेल्या महिला अत्याचारविरोधी परिषदेत उपस्थित केला. 

वासंती मंगल कार्यालय, बीड बायपास रोड येथे दुपारी या मेळाव्याचे उद्घाटन अत्याचारित महिलांच्या मुली-बहिणी व कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोणत्याच पाहुण्यांना हार- तुरे घालून सत्कार करण्याचा कार्यक्रम टाळण्यात आला. मेघानंद जाधव व संचाने बुद्ध-भीमगीते गाऊन वातावरण चैतन्यमय बनविले होते. जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. लता बामणे यांनी प्रास्ताविक केले, तर शहराध्यक्षा वंदना नरवणे यांनी आभार मानले. संग्राम मोरे व मानवता रक्षक ग्रुपतर्फे पंकज बनसोडे यांनी अंधारी व डोंगरगाव येथील पीडितांच्या नातेवाईकांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. विविध खेळांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या महिला खेळाडूंचा अंजली आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फिरदोस फातेमा खान यांंनी मोदी-शहांवर कडाडून टीका केली व कन्हैयाकुमारच्या स्टाईलमध्ये ‘आझादी’चे गीत आळवले. सरस्वती हरकळ व अरुंधती सिरसाठ यांची भाषणे झाली. 

स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत भारताचा जगात खूप खालचा क्रमांक आहे. गर्भात असल्यापासूनच मुलीवर अन्याय सुरू होतो. पितृसत्ताकमुळे स्त्रीला दुय्यम स्थान मिळते. महिलांवरील अत्याचाराचे मूळ जातिव्यवस्थेत आहे. जातिव्यवस्थेची काळी किनार या अन्याय-अत्याचारांना असतेच, असे अंजली आंबेडकर म्हणाल्या, तर रेखा ठाकूर या राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडल्या. भीमा-कोरेगाव प्रकरण घडले. त्या परिसरात सर्व ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. हे शरद पवार कसे विसरत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अ‍ॅड. बी.एच. कांबळे, संदीप शिरसाट, कृष्णा बनकर, अ‍ॅड. डी. व्ही. खिल्लारे, सिद्धार्थ मोकळे आदींसह मोठ्या संख्येने महिला व पुरुषही या मेळाव्यास उपस्थित होते. 

जिल्हाध्यक्षांबद्दल तक्रार...वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अलीकडेच बदलण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्याविरुद्ध एक महिला तक्रार घेऊन मंचावर पोहोचली होती. मात्र, नंतर तिला बाजूला करून तिचे म्हणणे ऐकून घेतले गेले. काही दिवसांपूर्वी सुभेदारी गेस्ट हाऊसवरही निरीक्षकांच्या समोर बन यांच्याविरुद्ध तक्रार झाली होती. महिला अत्याचारविरोधी परिषदेत वंबआच्या जिल्हाध्यक्षाबद्दलच महिला तक्रार घेऊन येते याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWomenमहिलाSupriya Suleसुप्रिया सुळे