शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

स्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत!

By स. सो. खंडाळकर | Updated: December 12, 2022 14:25 IST

महापुरुषांचा अपमान करीत वक्तव्य करणं हा सवंग प्रसिद्धीचा भाग असू शकतो का? की अभ्यासच नसल्यामुळे अर्धवट माहितीवर अशी वक्तव्ये येतात, हा संशोधनाचा भाग ठरावा...

- स. सो. खंडाळकरस्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत, असंच सध्याचं चित्र आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांवरची टिप्पणी औरंगाबादेतच केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डी.लिट. पदवी प्रदान समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार आणि केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपालांनी केलेलं शिवरायांच्या संदर्भातलं वक्तव्य अजून गाजतंय. ‘शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आयकॉन थे’ या त्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. संभाजीराजे व उदयनराजे दोघेही संतापले. जागोजागी राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनं सुरू झाली. अगदी जोडो मारो आंदोलनापर्यंत!

महापुरुषांचे एकेरी उल्लेख टाळता येऊ शकत नाहीत काय? पण ती राज्यपालही टाळत नाहीत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही टाळत नाहीत. याच औरंगाबादेत तापडिया नाट्यमंदिरात ‘रामदास स्वामी नहीं होते तो शिवाजी कुछ भी नहीं है’ असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी केलं होतं. हे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता विसरत नाही तोच याच औरंगाबादेत त्यांनी दुसरं वादग्रस्त वक्तव्य केलं. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरच्या माणसानं अशी वादग्रस्त वक्तव्ये करणं कितपत योग्य आहे हा खरा मुद्दा आहे. आता महाराष्ट्र कोश्यारी यांच्या उचलबांगडीची वाट पाहतोय.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनुदानावर अवलंबून न राहता भीक मागून शाळा काढल्या,’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे. शुक्रवारी पैठणला संतपीठाच्या कार्यक्रमातील वक्तव्यावरून पाटील यांना औरंगाबादेत सळो की पळो करून सोडलं गेलं. ते औरंगाबादहून पिंपरी चिंचवडला पोहोचले आणि तिथं त्यांच्या तोंडावर शाई फेकली.

औरंगाबाद हे वादग्रस्त वक्तव्ये करण्याचं ठिकाण बनत चाललंय. हे ठरवून होतंय का? शिवाजी महाराज यांच्यानंतर आता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांची नावं घेऊन व त्यांचा अपमान करीत वक्तव्य करणं हा सवंग प्रसिद्धीचा भाग असू शकतो का? की अभ्यासच नसल्यामुळे अर्धवट माहितीवर अशी वक्तव्ये येतात, हा संशोधनाचा भाग ठरावा... पण अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोख्याला तडा जातो, समाज दुभंगतो, वैमनस्य, विद्वेष वाढतो याचं भान राज्यकर्ते हरपून बसले की काय? अशी शंका येत आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीchandrakant patilचंद्रकांत पाटीलraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद