शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुक कधी होणार ? दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी केली तलवार म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:35 IST

महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या किमान दीड ते दोन हजार उमेदवारांनी सध्या तलवार म्यान केली आहे.

ठळक मुद्देवाॅर्डात कोणीच फिरकायला तयार नाही इच्छुक उमेदवार आता गायब झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

औरंगाबाद : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२१ मध्ये होईल, असा कयास लावण्यात येत असला तरी उमेदवारांना कसलीच शाश्वती राहिलेली नाही. निवडणूक लांबणीवर जाणार असे संकेत मिळू लागल्याने संभाव्य उमेदवारांनी वाॅर्डात पूर्वीसारखा संपर्क ठेवला नाही. कोरोना रुग्णांसाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे इच्छुक उमेदवार आता गायब झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोनामुळे शासनाकडून आणि आयोगाकडून निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर निवडणूक  आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, सर्वोच्च न्यायालयातील वाद कधी संपुष्टात येईल हेसुद्धा निश्चित नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या किमान दीड ते दोन हजार उमेदवारांनी सध्या तलवार म्यान केली आहे. 

औरंगाबादेत मार्च महिन्यात कोरोना आजाराचे रुग्ण सापडत होते. तेव्हा प्रत्येक वाॅर्डात विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार रस्त्यावर उतरून गोरगरीब नागरिकांना आणि रुग्णांना मदत करीत होते. कोरोना रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेणे आणि डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला सुखरूप घरी आणणे ही कामेसुद्धा इच्छुक उमेदवार पार पाडत होते. लॉकडाऊनमध्ये इच्छुक उमेदवारांनी सर्वात जास्त नागरिकांना मदत केली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाची गाडी घेऊन वाॅर्डातील रस्ते निर्जंतुकीकरण करण्याचा विडाच अनेकांनी उचलला होता. महापालिका निवडणूक लांबणार असे वाटू लागल्याने इच्छुक उमेदवारांनी वाॅर्डात येण्याचे टाळणे सुरू केले. वाॅर्डातील कोणत्या नागरिकांना कोरोना झाला आणि ते कधी परत आले हे सुद्धा आता इच्छुकांना माहीत नाही. लग्नकार्य, अंत्यसंस्कार आदींमध्ये इच्छुक उमेदवार सर्वात अगोदर दिसून येत होते. आता ते अंग काढून घेत असल्याचे दिसून येत आहे.

काही उमेदवार अजूनही निवडणूक मैदानातकाही वाॅर्डांमधील विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार मैदान सोडायला तयार नाहीत. वाॅर्डामध्ये नित्यनेमाने येणे, नागरिकांच्या भेटीगाठी घेणे असे उपक्रम सुरु आहेत. निवडणुका होतील तेव्हा होतील पण आपण नागरिकांच्या संपर्कात कायम राहिले पाहिजे, या मताचे ते आहेत. 

माहिती वकिलाकडे पाठविलीमहापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत महापालिका प्रशासनाने शपथपत्र दाखल करण्यासाठी वकिलाकडे संपूर्ण माहिती पाठवून दिली आहे. याचिकेची सुनावणी अद्याप बोर्डावर आलेली नाही.-सुमंत मोरे, उपायुक्त महापालिका

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक