शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

'पुरुष स्वतंत्र कधी होणार ?'; जागतिक पुरुष दिनी पत्नी पीडितांचे शीर्षासन आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:33 IST

पुरुषांसाठी हेल्प लाईन सुरु करून पुरुष दक्षता समिती स्थापन करावी

औरंगाबाद : पत्नी पिडीत आश्रमात जागतिक पुरुष दिन शीर्षासन आंदोलन करत साजरा करण्यात आला. पुरुषांसाठी सगळे कायदे उलटे आहेत, म्हणून शीर्षासन केल्याचे सांगत आंदोलकांनी यावेळी पुरुषांचे हक्क संरक्षणासाठी विविध मागण्या केल्या. महिला दिन साजरा करण्यात अनेक पुरुषांचाही सहभाग असतो. अनेक शासकीय कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. परंतु, पुरुष दिन कुठल्याही शासकीय कार्यालयात साजरा होताना दिसत नाही. हा भेदभाव संपुष्टात आणणे गरजेचे आहे, पुरुषांच्या संरक्षणाचे कायदे करा, पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, कौटुंबिक खटले वर्षभरात निकाली काढावीत आदी मागण्यां यावेळी पत्नी पिडीत पुरुष आश्रमाच्या सदस्यांनी केल्या. 

औरंगाबाद शहराजवळील वाळूज येथे पत्नी पिडीत पुरुष आश्रम आहे. येथे पत्नीपासून छळ होत असलेल्या पुरुषांना कायदेशीर मार्गदर्शन केले जाते. आज आश्रमात जागतिक पुरुष दिन शीर्षासन घालून साजरा करण्यात आला. यावेळी येथील सदस्यांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेल्या कायद्यांमुळे पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली नाही. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटला. परंतु एकतर्फी कायद्यांमुळे पुरुष महिलांच्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकला असून आता त्यांचे  सबलीकरण करण्याची गरज असल्याचा आरोप केला. बहुतांश पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहेत. लिंगभेद न करता कायदे बनवल्या गेले पाहिजेत. पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिले गेले पाहिजे. स्त्रियां कायद्यांचा गैरवापर करत असल्याने एकत्र कुटुंब पद्धत बुडाली, पत्नीच्या अत्याचाराने युवकांचा विवाहावरचा विश्वास उडाला आहे. पुरुष मेला तरी त्याच्या संपत्तीवर पत्नी दावा ठोकते. खरं तर आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. स्त्रियांच्या ह्या जाचाला पुरुष कंटाळले आहेत. आधी तुरळक घटस्फोट होत असत आता फार तुरळक जोडपी आपला संसार टिकवण्यामध्ये यशस्वी होतात. संसार मोडला याचं दुःख तर असतच त्याहून जास्त आपली मुलंबाळ दूर जातात, त्यांचे भविष्य धोक्यात येते, यासाठी आता पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. 

पुरुष संरक्षण कायदे करा दिवसेंदिवस पत्नीपीडित पुरुषांची संख्या वाढत चालली आहे. पत्नी पीडित पुरुष आश्रमात देशभरातून आतापर्यंत 9600 पुरुषांच्या तक्रारी आल्या आहेत. महिन्याला 200 ते 250 पुरुष तक्रारी येतात. खर तर याहून अधिक लोक पत्नी पीडित आहेत. मात्र, समाज काय म्हणेल या भीतीपोटी ते समोर येत नाहीत. यामुळे पुरुषांना कायद्याचे संरक्षण द्यावे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पुरुष दक्षता समिती स्थापन करा, हेल्प लाईन सुरु करावी, कौटुंबिक न्यायलयातील खटले एक वर्षांच्या आत निकाली काढावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, पांडुरंग गांडूळे, सोमनाथ मनाळ ,वैभव घोळवे, सुरेश फुलारे, जगदीश शिंदे, दासोपंत दहिफळे आदी सदस्यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWomenमहिलाCourtन्यायालय