शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी? किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार?

By संतोष हिरेमठ | Updated: February 7, 2024 20:14 IST

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या ९८ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले आहे. या दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पात २१४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी होणार, याकडे रेल्वे प्रवाशांचे आता लक्ष लागले आहे.

अमृत चतुर्भुज कॉरिडॉर योजनेत छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा प्रस्ताव असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर सुरू आहे. यासंदर्भात एक नकाशाही व्हायरल होत आहे. नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली. मालवाहतुकीसाठी बांधण्यात येत असलेल्या रेल्वे कॉरिडॉरशिवाय ऊर्जा, खनिज व सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि उच्च रहदारी घनता कॉरिडॉरची घोषणा केली.

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड-परभणी या एकेरी मार्गाचे विद्युतीकरण मार्गी लागले. कॉरिडॉर योजनेत छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण असल्याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला नाही.

१९३ कि.मी. चा मार्गगेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड या २९१ किलोमीटर अंतराच्या लोहमार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचे उत्तर यापूर्वी लोकसभेतील प्रश्नोत्तरात केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले होते, मात्र त्याचवेळी अंकाई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. आता परभणी-छत्रपती संभाजीनगर या १९३ कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण कधी होणार, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीtourismपर्यटन