शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका आल्या की, काहीही बोलण्यात पंतप्रधान कर्तृत्ववान : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:05 IST

पंतप्रधानांनी माहिती घेऊन बोलावे

ठळक मुद्देकाबाडकष्ट करून शेती पिकवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला हमी द्या.शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये सत्ता उलथवण्याची ताकद

औरंगाबाद : ‘पंतप्रधानपद हे महत्त्वाचे पद. पदाची प्रतिष्ठा ठेवा. त्या पदावर असलेल्या माणसाने तरी जरा नीट माहिती घेऊन बोललं पाहिजे. मी जे बोललोच नाही, त्यावरून माझ्यावर टीका करणे हे पंतप्रधानांना शोभत नाही’ असा टोला शरद पवार यांनी लगावला.

‘पाकिस्तानमध्ये सत्ता असलेली मंडळी व सैन्य आपल्या हातातून सत्ता जाऊ नये यासाठी सतत भारताविरुद्ध बोलत असतात, असे मी बोललो होतो. ही काय पाकिस्तानची स्तुती झाली, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. निवडणुका आल्या की, काहीही बोलण्यात पंतप्रधान कर्तृत्ववान आहेत, याबद्दल शंका नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या गड-किल्ल्यांवर बार संस्कृती वाढविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

शेतकऱ्यांबद्दलची चिंता काबाडकष्ट करून शेती पिकवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला हमी द्या. त्याच्या डोक्यावरचे कर्ज कमी करा. आज हे होताना दिसत नाही, म्हणून टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करणे गुन्हा असतानाही तो स्वत:ला संपवून घेतोय; पण याच शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आहे, हे लक्षात घ्या, असा इशारा पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. 

जयाजी सूर्यवंशी यांनी पोलीस अडवत असतानाही शरद पवार यांना शेतकऱ्यांचा आसूड दिला. हा आसूड त्यांनी उंचावताच टाळ्या पडल्या. मंचावर माजी आमदार किशोर पाटील, चंद्रकांत घोडके, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, सुधाकर सोनवणे, छाया जंगले, वीणा खरे, मेहराज पटेल, रंगनाथ काळे, विजय साळवे, अभिषेक देशमुख, अभय चिकटगावकर,   सोहेल कादरी, दत्ता भांगे, प्रतिभा वैद्य, एकनाथ गवळी, रावसाहेब दारकोंडे आदींची उपस्थिती होती.

वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर  हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, आज या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने व शेरशायरीयुक्त भाषणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार, हे स्पष्ट  झाले. जालना रोडवरील हॉटेलमध्ये रात्री पवार यांनी मुक्काम केला. यादरम्यान जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे यांनी पवार यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली.आमदार सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कदीर मौलाना, विलास चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, माजी आमदार संजय वाघचौरे यांची यावेळी भाषणे झाली. प्रदीप सोळुंके यांनी सूत्रसंचालन केले.

क्षणचित्रे : ‘साहेब, कर्तृत्व बोलते तुमचे, दिशा दाखवली तुम्ही, चार फितुर जाहले तरी लाखो सोबती आम्ही,’ अशी वाक्ये व्यासपीठाच्या बॅनरवर झळकत होती. सोबतीला शरद पवारांचाच एकट्याचा फोटो होता. हातानेच इशारा करीत शरद पवार व्यासपीठावरील अनावश्यक गर्दी नियंत्रित करीत होते. दिलेल्या निवेदनांवर व वर्तमानपत्रांवरील बातम्यांवर त्यांची नजर जात होती. ‘एकच साहेब... पवार साहेब’, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो’ अशा घोषणा दुमदुमत होत्या. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा