बीड : बीड तालुक्यातील नेकनूर मार्गे केज, अंबाजोगाई व परळीकडे जाणाऱ्या बसगाड्या बसस्थानकाच्या आत न येताच बाहेरूनच निघून जातात. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मांजरसुंबा-केज, अंबाजोगाई, परळी मार्गावर दिवाळीच्या सुट्टीमुळे नागरिकांची बसला मोठी गर्दी होत आहे़ यातच चाकरमाने देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. बसगाड्याच्या असुविधेमुळे नागरिकांना त्रास करावा लागत असून सदरील मार्गावरील नेकनूर येथे बसगाडी न थांबविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे़सध्या दिवाळीच्या सणामुळे बसगाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे़ याशिवाय अंबाजोगाई ते बीड या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शासकीय व निमशासकीय कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात़ परंतु अंबाजोगाईहून बीड ला येणाऱ्या व बीडहून अंबाजोगाई, परळीकडे जाणाऱ्या बसगाड्या नेकनूरच्या बसस्थानकावर थांबत नसल्याचा प्रकार मागील तीन चार महिन्यापासून सुरू आहे़ यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत़ असे जी़ एस़ डोरले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़नेकनूर येथील शासकीय रूग्णालय, महाविद्यालय व बँकेत काम करणारे कर्मचारी सायंकाळी नेकनूरच्या बसस्थानकात बीडला येण्यासाठी एसटीची वाट पहातात़ मात्र परळी, अंबाजोगाई कडून आलेली बसगाडी नेकनूरला उभीच करत नाहीत़ अनेकवेळा तर बसस्थानकात बसगाडी न आणताच बसस्थानकाच्या बाहेर उभी केली जाते़ असे प्रवाशांनी सांगितले़ याबाबत नेकनूर येथील बसस्थानक प्रमुखांकडे प्रवाशांनी अनेकवेळा तक्रार केलेली आहे़ परंतु संबंधीत विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी प्रवाशांनी केला आहे़बसगाड्यांच्या या प्रकारामुळे नागरिकांना खाजगी व अवैध वाहतूकीने प्रवास करावा लागत असून याचा त्रास प्रवाशांना होत आहे़ याबाबत विभाग नियंत्रक पी.बी. नाईक यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
स्थानकात न येताच बसगाड्या गावाला
By admin | Updated: October 18, 2014 23:45 IST