शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या विरोधात लढणार व्हॉटस् अॅप; औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:09 IST

कृषी विभागाने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांपर्यंत बीटी कपाशीच्या भोवती नॉन बीटी कपाशीची लागवड करावी, ज्यामुळे बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

या संदर्भात जि.प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हा कपाशी पिकाच्या उत्पादनाकडे अधिक आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी बीटी कपाशी भोवती नॉन बीटी कपाशीच्या सरी पेराव्यात, असे आवाहन केले होते; पण त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. यंदा यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मेळाव्यामध्येही या संदर्भात कृषी निविष्ठांची खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना नॉन बीटी कपाशीच्या लागवडीसंदर्भात सांगण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले. 

व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून जागृती यावर्षी व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदेश पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ५०० कृषी सेवा केंद्र असून, यापैकी कार्यरत १५०० केंद्र आहेत.पेरणीच्या हंगामात या कृषी सेवा केंद्रांचा आणि शेतकऱ्यांचा जवळचा संबंध येत असतो. हे गृहीत धरून जि.प. कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रचालकांना व्हॉटस् अॅप संदेश पाठविला जाईल. तो संदेश पुढे कृषी सेवा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आशयाचा पहिला संदेश सोमवारी व्हॉटस् अॅपद्वारे देण्यात आला आहे. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप