शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

'इथं काय गाठोडं ठेवलंय का'?; सोशल डीस्टसिंगचा फज्जा उडवणाऱ्यांना अजित दादांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 12:09 IST

Ajit Pawar अक्षरश: लोटालोटी व आरडाओरड्यात सोशल डिस्टन्सिंगचे भान हरपलेल्या व अर्धेअधिक विनामास्क येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी सोमवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.

ठळक मुद्देअजित पवार यांचे आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी लोटालोटी सुरू झाली. सुरक्षित अंतराचा फज्जा उडवत भेटणाऱ्या शिष्टमंडळांना लगावला टोला

औरंगाबाद : कोरोनाकाळात सर्वसामान्य जनता सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करत असतांना राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच ठिकठिकाणी गर्दी करत असल्याचा प्रत्यय थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी आला. त्यामुळे या शिष्टमंडळांना उद्देशून त्यांनी ‘इथं काय गाठोडं ठेवलंय का’ असा टोला लगावला.

अक्षरश: लोटालोटी व आरडाओरड्यात सोशल डिस्टन्सिंगचे भान हरपलेल्या व अर्धेअधिक विनामास्क येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी सोमवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. वार्षिक नियोजन आराखड्याची बैठक सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी संपल्यानंतर पवार यांचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सुभेदारी विश्रामगृहावर आगमन झाले. तेथे आधीच अनेक शिष्टमंडळांची मोठी गर्दी झालेली होती. अनेकांच्या हातात मागण्यांची निवेदने व पवार यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ होते. सुभेदारीवर पोलीस बंदोबस्तही तगडा होता. अजित पवार यांचे आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी लोटालोटी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी प्रारंभी दरवाजे बंद करून घेतले नंतर शिष्टमंडळांना प्रवेश दिला जाऊ लागला तेव्हा पुन्हा लोटालोटी सुरू झाली. काहींनी आरडाओरड केली. रेटारेटीत सुरक्षित अंतराचा फज्जा उडवतच ही शिष्टमंडळे उपमुख्यमंत्र्यांना भेटली.

सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत एकानंतर एक शिष्टमंडळे भेटत राहिली नंतर त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता व पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी चर्चा केली.सुभेदारीच्या मुख्य सभागृहातील बाजूच्या सूटमध्ये उभे राहूनच उपमुख्यमंत्र्यांनी ही निवेदने स्वीकारली. काही शिष्टमंडळे सभागृहातच पवार यांची वाट पाहत‌ बसली‌ होती. ‘इथं काय गाठोडं ठेवलंय का’ असा टोला मारत आतील शिष्टमंडळांनाही ते भेटले. संभाजी ब्रिगेड, मुप्टा, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ यांच्यासह विविध मागण्या घेऊन अनेक शिष्टमंडळे आलेली होती. या सर्वांची निवेदने उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वीकारली. त्यांच्यासमवेत आमदार सतीश चव्हाण, जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत पवार यांना पत्रकारांनी राजकीय मंडळीच अधिक गर्दी करत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर पवार यांनी मुंबईला गेल्यावर सर्व पक्षप्रमुखांना बोलून यावर काही उपाययोजना करण्याचा मानसही व्यक्त केला होता.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद