शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिक मास अन् उसाच्या रसाचा संबंध काय? रसवंतींवर अचानक गर्दी, २५ क्विंटल ऊस संपला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 24, 2023 12:44 IST

उन्हाळ्यात नव्हे पावसाळ्यात मागणी; नागरिकांनी रांगा लावून पार्सलमध्ये नेला उसाचा रस

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू आहे यामुळे शहरात बोटावर मोजण्याइतक्या रसवंती सुरू असून रविवारी अचानक ग्राहकांची एवढी गर्दी वाढली की, रसवंतीमधील २५ क्विंटल ऊसच संपून गेला. शहानूरमिया दर्गा परिसरात चक्क रसासाठी रांगा लागल्या होत्या. ज्यांना रस मिळाला ते तो रस पीत नव्हते तर घरी पार्सल घेऊन जाताना दिसले.

भर उन्हाळ्यात उसाचा रस पिण्यासाठी एवढी गर्दी वाढली नव्हती. मग, पावसाळ्यात, तेही रविवारच्या दिवशी अचानक रसाला एवढी मागणी का वाढली. ग्राहकांची रसवंतीवर गर्दी का उसळली, याचे कारणही रसवंती मालकाला कळेना. प्रत्येक ग्राहक घाईघाईत येत होता व एक ग्लास, दोन ग्लास उसाचा रस तेही पार्सल मागत होता. रसवंतीमध्ये कोणीच रस पीत नव्हते. जो तो रस पार्सल मागवित असल्याने हा प्रकार काय आहे, या विचाराने रसवंती मालकांचे डोके चक्रावून गेले होते. मागणी एवढी होती की, दुपारी १२ वाजेपर्यंत रसवंतीमधील सर्व ऊस संपला होता. रसवंतीच्या मालकाने मोबाइलवर उसाची ऑॅर्डर दिली पण उस रसवंतीपर्यंत येण्यास २ ते ३ तास लागणार होते. त्यात आता उसाचा हंगाम संपत आल्याने लवकर ऊस मिळणे कठीण झाले होते. शहरातील नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातूनही लोक उसाचा रस खरेदीसाठी शहरात येऊ लागल्याने व वाढत्या गर्दीमुळे अखेर रसवंतीवाल्यांनी आपली दुकाने बंद करून टाकली होती. असंख्य ग्राहकांना रस न मिळाल्याने खाली हात जावे लागले.

का वाढली अचानक उसाच्या रसाला मागणीअधिक मास सुरू आहे. या काळात तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. विशेषत: अधिक मासाच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा, यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते, असे शास्त्रात लिहिले आहे. यामुळे शनिवारी व रविवारी उसाचा रस खरेदीसाठी रसवंतीवर गर्दी उसळली होती.

शहरात एकच चर्चातुळशीला उसाचा रस अर्पण करावे ही एकच चर्चा शहरात दिसून आली. घरोघरी तुळशीला रस अर्पण करण्यासाठी लगबग सुरू झाली होती. तुळशीची पूजा कशी करावी, यासाठी सोशल मीडियावर अनेक मेसेज, व्हिडीओ शेअर केले जात होते.

दुपारीच शटर बंद करावं लागलेशनिवारी सकाळपासूनच ऊसाचा रस पार्सल नेण्यासाठी रसवंतीवर गर्दी होती. मात्र, आज एवढी गर्दी उसळली की, दुपारिच शटर खाली घ्यावे लागले. पावसाळा असला तरी सध्या दररोज २०० ते ३०० ग्लास रस विकला जातो. मात्र, आज ५ हजार ग्लास उसाचा रस विकल्या गेला आणि तेही सर्व ग्राहकांनी पार्सल नेला. ऊस उपलब्ध नसल्याने अखेर रसवंतीचे शटर खाली घ्यावे लागले.- माजीद खान, रसवंती मालक

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक