शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो, म्हणून...; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 17:21 IST

"तुम्हाला ते तर जवळही घ्यायला तयार नाहीत. तरी आमची आघाडी झाली म्हणून बोंबलत आहात. नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुमच्या सोबत होता, म्हणून..."

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेनाएकनाथ शिंदे गट, यांच्यात 'नालायक' या शब्दावरून जबरदस्त शाब्दिक चकमक सुरू आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'नालायक' शब्द वापरत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यानंतर दोन्ही गटात शब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. आता या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे. "नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुमच्या सोबत होता, म्हणून तुम्हाला ही सत्ता भोगता आली होती, हे विसरू नका," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ते प्रत्रकारांसोबत बोलत होते.

शिरसाट म्हणाले, "परवाच पृथ्विराज चव्हान म्हणाले,  राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सरकार कोसळले, म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. एकंदरित असे चित्र आहे. तुम्हाला ते तर जवळही घ्यायला तयार नाहीत. तरी आमची आघाडी झाली म्हणून बोंबलत आहात. नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुमच्या सोबत होता, म्हणून तुम्हाला ही सत्ता भोगता आली होती, हेही विसरू नका."   

तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात -"या नालायक शब्दासंदर्भा जे स्पष्टिकरण देत आहेत, त्या नालायकांना मला सांगायचे आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, पण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण नालायक शब्द चांगला आहे. तुम्हाला तो आवडतोय, म्हणून मी तो वापरतोय. नालायकांनो ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वासाठी आपली हायात घालवली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू नये, असे ज्यांचे मत होते. त्यांचे मत डावलून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. नालायकांनो तुम्हाला हे पाप फेडावे लागणार आहे. म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. खरे तर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना हे मांडीवर घेऊन बसू लागले आहेत. म्हणून यांच्या तोंडात असे शब्द येऊ लागले आहेत. जे यांना शिव्या देत होते. जे यांची टिंगल टवाळी करत होत्या, अशा लोकांच्या सहवासात असल्याने यांच्या तोंडात असे शब्द येत आहेत," अशा बद्दात शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांव हल्ला चढवला.

एकनाथ शिंदे आता सर्वसामान्यांना मान्य असलेलं नेतृत्व होत आहेत -एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे नेते झाल्याचे दुःख तुम्हाला होत आहे, शिवसेने प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत, याचं दुःख तुम्हाला होत आहे. एकनाथ शिंदे आता सर्वसामान्यांना मान्य असलेलं नेतृत्व होत आहेत, ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही बसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार? हीच तुमची लायकी आहे ना. आज एकनाथ शिंदे सर्वधर्माच्या नेत्यांना एकत्र घेऊन सर्वांसामान्यांसाठी काम करत आहेत. मग तो मराठा असो ओबीसी असो, एसी असो, मग तो कुणठल्याही समाजाचा माणून असो, तो त्यांच्यासोबत जोडला जात आहे. ही तुमची पोटदुखी आहे," असेही शिरसाट यावेळी म्हणाले.

कोण तो दळवी-भोळवी... -शिरसाट म्हणाले, कोण तो दळवी-भोळवी तो, त्या कणकवलीला नारायण राणे यांच्या विरोधात प्रचार करायला आम्ही गेलो होतो. तेव्हा हा घर सोडून पळाला होता. म्हणून त्याला त्याची जागा आम्हीच दाखवली आहे. बुथवर हे बसत नव्हते आणि हे आम्हाला शिकवत आहेत. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण