शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘चाललो’ म्हणायला हरकत नाही, पण जायचं कुठं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:07 IST

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडले

ठळक मुद्देमला डावलण्याची भाजप- सेनेची भूमिका अयोग्य कमळ चिन्हावर लढणार नाही जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा

औरंगाबाद/जालना : भाजप- शिवसेनेने मला अडचणीत आणलंय. मी त्यांची भूमिका देशभर मांडतोय. पण मला मात्र ते डावलताहेत, हे योग्य नाही. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली. आता उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईची जागा सोडली पाहिजे. नाही तर ईशान्य मुंबईमधून मी लढू इच्छितो. ती तरी सोडावी, अशी विनवणी करून रिपाइं (ए) चे राष्ट्रीय  अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. ‘यांना’ चाललो म्हणायलाही हरकत नाही, पण जायचं कुठं हाही प्रश्न आहेच’ अशी हतबलताही त्यांनी औरंगाबादेत व्यक्त केली. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आठवले हे गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात गेले होते. तसेच जालना येथे समाजकल्याण खात्यांतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करून ते दुपारी औरंगाबादला आले होते. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला.

ते म्हणाले, युती करताना मला विश्वासात तर घेतले गेले नाहीच. शिवाय माझ्यासाठी एकही जागा सोडली नाही. ही भूमिका नाराज करण्यासारखी आहे, धक्का देणारी आहे. जास्त जागा मागून युतीला अडचणीत न आणण्याची माझी भूमिका असतानाही मला एकही जागा न सोडण्याचा निर्णय हा अन्याय होय. त्यांच्या सिटिंगच्या जागा सोडायला ते तयार नाहीत. पण फिटिंग करण्याचं काम माझ्याकडे आहे, हे त्यांनी विसरू नये. मागच्या विधानसभा निवडणुकीत आठ जागा रिपाइं (ए) ला देण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. रिपाइंचे उमेदवार थोड्या थोड्या मतांनी पराभूत झाले. आता विधानसभेच्या कुठल्या जागा देणार हे माहीत नाही. आम्हाला टाळून त्यांना चालणार नाही. मग कुणाला निवडायचे व पाडायचे हे आम्ही ठरवू. रिपाइंच्या दोघांना सहा सहा महिने मंत्री करतो म्हणाले होते, तेही झाले नाही. त्यातील सहा महिने निघूनही गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कमळ चिन्हावर लढणार नाही मला एखादी जागा मिळाली तर मी कमळ चिन्हावर लढणार नाही. रिपाइंच्या चिन्हावरच लढेन. तसेच  युतीने वा आघाडीने मला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात लढा असे सांगितले तरी मी त्यांच्या विरोधात लढणार नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांच्या विभाजनाचा आपल्याला फायदा होणारच आहे, असे युतीच्या नेत्यांना वाटत असावे म्हणूनही मला डावलण्यात येत असावे, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला.

...सोडणार नाही तुमचा पिच्छाजालना येथे आपल्या मिश्कील स्वरात रामदास आठवले यांनी चारोळीच्या माध्यमातून युतीवर हल्ला केला. शिवसेना भाजपचे बरे चालले आहे... पण जरा आमचंही बघा. काहीही असले तरी मी नाही सोडणार तुमचा पिच्छा युती झाल्याने तुम्हारा हो गया अच्छा ... पण जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा... कारण मलाही लोकसभा लढविण्याची आहे इच्छा...

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडलेशिवसेना, भाजपाची युती व्हावी यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, मलाच वाऱ्यावर सोडल्याची खंत रामदास आठवले यांनी गुरुवारी जालन्यात व्यक्त केली.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक