शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 18:50 IST

ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे.

चित्तेपिंपळगाव : ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांनी येथे दिली.पिंपळगाव पांढरी येथे समाजभान कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित पाणंद रस्ते व स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भागचंद ठोंबरे, तालुका खरेदी विक्री संचालक दत्तू ठोंबरे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस एकनाथ गवळी, सरपंच राम एरंडे, पं.स.सदस्य शुभम पिवळ, राजाराम ठोंबरे, वैजिनाथ तवार, सरपंच योगेश ठोंबरे, नाना बोंबाळे, अप्पासाहेब ठोंबरे, ज्ञानदेव ठोंबरे,उत्तम ठोंबरे,दगडू बोंबाळे, रामू बोंबाळे, सुखदेव ठोंबरे,अर्जुन सूर्यवंशी, सरपंच दीपक मोरे, सरपंच सरस्वती गवळी, भगवान तवार,चिंतामण तवार,बाळासाहेब यादव,माजी सरपंच नवनाथ कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सांजखेडा व पिंपळगाव पांढरी येथे पाणंद रस्ते, स्वच्छता अभियानास सामाजिक कार्यकर्ते डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांच्या स्वखर्चातून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत डॉ. पुजारी यांनी पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १८५ गावांत स्वखर्चातून न वेडी बाभूळ निर्मूलन, पाणंद रस्ते व गाव स्वच्छता अभियान राबविल्याचे विठ्ठलराव मुळे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, विठ्ठलराव मुळे, अमोल चिंतामणी, फिरोज पठाण, बाबासाहेब मुळे, युसूफ पठाण आदींनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद