शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात- नायक

By admin | Updated: November 10, 2014 23:51 IST

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करुन घेण्याबरोबरच मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी पुरवठ्या संदर्भात एकाही नागरिकांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आज येथे आयोजित पाणी टंचाई व चारा टंचाई संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) एन.आर. शेळके, जालन्याचे उप विभागीय अधिकारी मंजुषा मुथा, भोकरदनचे उप विभागीय अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, अंबडचे उप विभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, परतूरचे उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार छाया पवार, रूपा चित्रक, रेवनाथ लबडे, अभय चव्हाण, महेश सावंत, भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार सोनाली जोंधळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे, वरिष्ठ भू- वैज्ञानिक प्रकाश शेलार, उप विभागीय कृषी अधिकारी ए.आर. देशमुख, बी.एम. रोकडे, श्री जोशी, जारवाल यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, जिल्ह्यात पाणीटंचाई तसेच चाराटंचाईवर मात करण्यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करुन घ्याव्यात. यामध्ये नवीन विंधन विहिर, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजना, तात्पुरती पूरक योजना, खाजगी विहिर अधिग्रहण करणे, बुडकी घेणे, जलभंजन करणे तसेच मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी कामे करण्याबरोबरच तांत्रिक कारणाअभावी बंद असलेल्या योजना तातडीने दुरुस्त करुन घ्याव्यात. विद्युत पुरवठ्या अभावी ज्या ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना बंद असतील त्या तातडीने सुरु करण्यात याव्यात. तसेच नादुरुस्त असलेले हातपंपही दुरूस्त करुन घ्यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी व अनाधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.