शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

विनाक्रमांकांचे पाणीपुरवठा टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:24 IST

एन-५ येथील जलकुंभावर विनाक्रमांकाचे व अनोळखी टँकर भरण्यास पालिकेने सोमवारपासून बंदी आणली आहे. तसेच टँकरच्या फेऱ्यांचे रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना आदेशित केल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन-५ येथील जलकुंभावर विनाक्रमांकाचे व अनोळखी टँकर भरण्यास पालिकेने सोमवारपासून बंदी आणली आहे. तसेच टँकरच्या फेऱ्यांचे रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना आदेशित केल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले आहे.लोकमतने १८ जूनच्या अंकामध्ये टँकरच्या फे-यांची तीन दिवस माहिती संकलन ३५ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचा वृत्तांत प्रकाशित केला. त्या वृत्तांताची दखल घेत पालिका खडबडून जागी झाली. कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी एन-५ येथील सर्व फे-यांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले. दिवसभरात २५० च्या आसपास टँकर तेथून भरले जातात. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा हा आकडा आहे. यानंतरही टँकर भरणे सुरूच असते. सिडको-हडको परिसराचे पाणी टँकरमधून मोठ्या प्रमाणात गायब होत आहे. येथील पम्पिंग स्टेशनवरून किती टँकर भरले जावेत, याचे काहीही नियोजन नाही.चौकशी करण्यात येईलसभापती राजू वैद्य यांनी सांगितले, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शहरातील नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसताना टँकरचा गोरखधंदा खपवून घेतला जाणार नाही. दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला पत्राद्वारे केल्याचे त्यांनी कळविले.पालिका आयुक्तांनी कळविलेमनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले की, या प्रकरणात मी स्वत:हून काही माहिती समजून घेईन. लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त वाचल्यानंतर याप्रकरणी पूर्णत: माहिती संकलित करण्यासाठी मी कार्यकारी अभियंता कोल्हे यांना कळविले आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका