शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:23 IST

सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाकडून अघोषित पाणी कपात करण्यात आल्यामुळे वाळूज गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी दोन महिने भीषण टंचाईचे राहणार असल्याने प्रशासनाची परीक्षा ठरणार आहे.

वाळूज ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरु केलेला आहेत. गावात एमआयडीसी प्रशासनाने पाणी पुरवठा सुरु केल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. ग्रामपंचायतीला दररोज एमआयडीसीकडून जवळपास १४ लाख लिटर पाणी मिळत असल्यामुळे गावात नळयोजनेद्वारे ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरु केला होता. मात्र, २७ मार्चपासून एमआयडीसी प्रशासनाने अचानक पाणी कपात केल्याने गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. आजघडीला गावात केवळ ६ लाख लिटरच्या आसपास पाणी मिळत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या तीन सार्वजनिक विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी नागरिकाकडून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला जात असून पाणी प्रश्नाकडे पदाधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

वाढीव पाणी पुरवठ्यासाठी पत्रव्यवहारगावातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन ग्रामपंचायती प्रशासनाने जिल्हाधिकारी व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाणीकपात मागे घेण्याची मागणी केल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले.

जारची मागणी वाढलीगावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या शुद्ध पाण्याला मागणी वाढली आहे. नियोजनाअभावी गावातील नागरिकांना कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीWalujवाळूजwater scarcityपाणी टंचाई