शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पाणीपुरवठा मंत्र्यांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:54 IST

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिलमध्ये एका इंग्लंडस्थित भारतीयाचा दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी जालना येथे पत्रकार परिषदेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिलमध्ये एका इंग्लंडस्थित भारतीयाचा दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी जालना येथे पत्रकार परिषदेत केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधींची बेनामी संपत्ती गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी जेथलिया यांनी केली.माजी आ. जेथलिया म्हणाले की, राजकीय विरोधकच राहू नये म्हणून वैयक्तिक द्वेषातून आपल्यासह कुटुंबातील सदस्यांवर राजकीय सूड उगवला जात आहे. पालकमंत्री लोणीकर यांनी केलेल्या अनेक तक्रारींची स्थानिक प्रशासनासह मंत्रालयीन स्तरावरही चौकशी करण्यात आली. त्यातून सर्व अहवाल आपल्या बाजूने आहेत. असे असताना विविध प्रकरणांत आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून विरोधात आवाज उठविणा-यास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून, यावर योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे. गत तीन वर्षांत पालकमंत्री लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे काम करण्यात आले आहे. तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्र कार्यकर्त्यांच्या नावावर लोणीकर यांनी जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली आहे. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिका-यांच्या बदल्या केल्या जात आहेत. याचा विकास कामांवर परिणाम होत असून, चांगल्या अधिका-यांना काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली. तसेच मलबारहिल बंगला परिसरात यशवंत कुलकर्णी व दिगंबर सस्ते यांच्या नावे मंत्री लोणीकर यांनी मालमत्ता खरेदी केली असून या मुखत्यारनाम्याची प्रत आपल्याकडे असल्याचा दावा जेथलिया यांनी केला.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची लेखी मागणी मूळ मालक फिरोज दुगन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे केली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे मंठा तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे आदी उपस्थित होते.जेथलियांचे आरोप राजकीय द्वेषातूनपरतूर मतदारसंघामध्ये आपल्या नेतृत्त्वात विविध विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी योजनांमधील १७६ गावांच्या २३४ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे काम ३५ % पूर्ण झाले आहे. मतदार संघातील दोन मोठे रस्ते राष्ट्रीय महामार्गात मंजूर करून प्रगतिपथावर आहेत. विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांसाठी त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशा पोटी खोटे आरोप करीत आहेत. मुंबई येथील जमनादास मेहता लॉन साईड ६, मार्ग क्र.(५) २४२, मलबार हिल डी वॉर्ड, मुंबई -४००००६, या मालमत्तेशी आमचा व आमच्या कार्यालयाचा काहीही संबंध नाही. हा जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा प्रयत्न असून या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही विचार करीत आहे. सुरेशकुमार जेथलिया यांनी मानसिक संतुलन ढळू न देता आरोप करावेत, असा खुलासा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे.