शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा १७ टक्क्यांवर; सात दिवसांत पाच टक्क्यांनी झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:39 IST

मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा सात दिवसांत पाच टक्क्यांनी वाढला आहे. ११ जुलै रोजी १२.४४ टक्के पाणीसाठा होता.

औरंगाबाद : मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा सात दिवसांत पाच टक्क्यांनी वाढला आहे. ११ जुलै रोजी १२.४४ टक्के पाणीसाठा होता. बुधवारी पाणीसाठा १७.२२ टक्क्यांवर पोहोचला. मराठवाड्यात धरणांत सध्या २६०९.८० दलघमी इतके पाणी आहे.

पावसाळा सुरू होऊन महिना उलटला. मोठ्या खंडानंतर  गेल्या सात दिवसांत ठिकठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यातील धरणांतील पाण्यात वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांत निम्न दुधना प्रकल्पात १४.४३ टक्क्यांवरून १५.१८ टक्के (१३९.३६ दलघमी), येलदरी प्रकल्पात १२०.३१ वरून १२१.४३ दलघमी, सिद्धेश्वर प्रकल्पात १४५.६८ वरून १५३.९३ दलघमी, माजलगाव धरणात ०.१९ वरून २.४४ टक्के (१४९.६० दलघमी), मांजरा धरणात ६.२६ वरू न ६.०९ टक्के (५७.८७ दलघमी), सीना कोळेगाव प्रकल्पात ६६.४८ वरून ६५.२९ दलघमी पाणीसाठा झाला आहे. तर निम्न मनार प्रकल्पात ९.८० टक्के (२२.२५ दलघमी), निम्न तेरणा प्रकल्पात ४२.१८  टक्के (६८.४५दलघमी) पाणीसाठा आहे.  

 जायकवाडीत वाढजायकवाडी धरणात ११ जून रोजी २३.४१ टक्के पाणीसाठा होता. ११ जुलै रोजी हा पाणीसाठा १९.३० टक्क्यांवर आला होता. अवघ्या महिनाभरात ४.११ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली. नाशिक जिल्ह्यातील पावसाने अखेर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २१.६० टक्के इतका पाणीसाठा  झाला.

‘विष्णूपुरी’ ८० टक्के भरलामागील तीन दिवसांपासून नांदेड आणि परिसरात सुरू असलेला भीजपाऊस आणि पूर्णेतून होत असलेली पाण्याची आवक यामुळे बुधवारी सकाळी ९ वाजता विष्णूपुरी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. विष्णूपुरीतील पाणी साठ्यामुळे नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. विष्णूपुरीची ८० दलघमी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असून सद्य:स्थितीत या प्रकल्पात ६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  दिग्रस, अंतेश्वर प्रकल्पातून पूर्णेत पाणी येते आणि तेथून पाण्याचा प्रवाह विष्णूपुरीमध्ये दाखल होतो. प्रकल्पाच्या वरील भागात होत असलेल्या मोठ्या पावसामुळे विष्णूपुरीत पाण्याची आवक वाढली आहे.   जिल्ह्यात सरासरीच्या ४२.५४ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत नांदेड- ५.६३, मुदखेड- १२.६७, अर्धापूर- १९.३३, भोकर- १०.७५, उमरी- १७.३३, लोहा- ००.५०, किनवट- १.५७ तर हदगाव, धर्माबाद तालुक्यात प्रत्येकी एक मि.मी. पाऊस झाला आहे.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरणMarathwadaमराठवाडा