जालना : ऐन उन्हाळ्यात जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फोडल्याप्रकरणी इंदेवाडी येथील पिता-पुत्राविरुद्ध रविवारी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक शांतवन कसबे यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जालना-अंबड रोडवर इंदेवाडी येथे रवि नारायण वाहुळ व नारायण मोतीराम वाहुळ या दोघांनी जायकवाडी ते जालना या शासकीय पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फोडून पाणी घरात घेतले. जलवाहिनीचे नुकसान केले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक त्रिनेत्रे हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
जलवाहिनी फोडली; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: April 27, 2015 00:54 IST