शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या भूजल पातळीत दरवर्षी दोन मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:05 IST

सतत दुष्काळास सामोरे जाणाऱ्या औरंगाबादच्या पाणी पातळीत दरवर्षी घटत होत असून, दरवर्षी सरासरी दोनने कमी होऊन ५ वर्षांत १२ मीटरने खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणतर्फे यंदा मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यात पुन्हा २ मीटरची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष अधिक जटिल होताना दिसत आहे.

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षणाची धक्कादायक माहिती : पाच वर्षांत १२ मीटरने घटली पातळी, यंदा त्यात दोन मीटरची भर

- साहेबराव हिवराळे-औरंगाबाद : सतत दुष्काळास सामोरे जाणाऱ्या औरंगाबादच्यापाणी पातळीत दरवर्षी घटत होत असून, दरवर्षी सरासरी दोनने कमी होऊन ५ वर्षांत १२ मीटरने खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणतर्फे यंदा मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यात पुन्हा २ मीटरची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष अधिक जटिल होताना दिसत आहे.भूजल सर्वेक्षणतर्फे जिल्ह्यातील १४१ स्थिर निरीक्षण विहिरींतील पाणी पातळीची गत ५ वर्षांतील सरासरी आकडेवारी घेतली असता धक्कादायक अवस्था दिसते आहे. मागील पाच वर्षांत भूजल पातळी सरासरी ११.४८ मीटर (४० फूट) खोल गेली. यंदा २०१९ मार्च महिन्यात ही पाणी पातळी आणखी दोन मीटरने खालावली आहे. जमिनीतील पाणी पातळीत वाढ किंचितही जाणवत नसून, ती वरच्या वर पुन्हा खालावत असल्याचे भयावह चित्र समोर आहे. उन्हाचा पारा वाढला असून, जमिनीतील पाणी पातळीत झपाट्याने घट झालेली आहे. मे महिन्याची सुरुवात झाली असून, यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी अद्याप काही सांगता येत नाही. दरवर्षीचा हवामानाचा अंदाज अचूक ठरला नसल्याने शेतकरीही चिंतातुरच आहेत. सध्याच चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड्यातही टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. जनावरांच्या चारा छावण्या सुरू झाल्या आहेत; परंतु पाणी प्रश्न सतावतो आहे.याविषयी कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड म्हणाले की, भूजल पातळीची मागील ५ वर्षांतील स्थिर भूजल पातळीशी तुलनात्मक स्थिती तपासली आहे. त्यात सतत घट दिसते आहे. मे महिन्यातील शेवटी पुन्हा स्थिती मोजली जाणार आहे.झपाट्याने घट होत आहेजिल्हाभरात पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून, यंदा पुन्हा २ मीटरने घट झालेली आहे. ही आकडेवारी मार्च २०१९ ची आहे. कमी पर्जन्यमानाने भूगर्भात पाणी पातळीत वाढ झालेलीच नाही.-डॉ. पी. एल. साळवे, उपसंचालकभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, औरंगाबाद विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी