शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाणी साठविले, मोबदल्याला मात्र ठेंगा, जमिनी पाण्याखाली, शेतकरी दारोदारी, कोट्यवधी रुपयांची थकबाकी सरकार कधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:05 IST

Farmer: जायकवाडी प्रकल्पासह इतर प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यावर पाणी साठविले; मात्र अनेक वर्षांपासून माेबदल्यासाठी शेतकऱ्यांना ताटकळण्याची वेळ आली आहे.

- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पासह इतर प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यावर पाणी साठविले; मात्र अनेक वर्षांपासून माेबदल्यासाठी शेतकऱ्यांना ताटकळण्याची वेळ आली आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी सरकार कधी देणार, असा प्रश्न असून कोर्टकचेरी, लवादात हेलपाटे मारून शेतकरी थकले आहेत.

पहिली, दुसरी पिढी तर मोबदल्यासाठी हेलपाटे मारून संपली आहे. मागील तीन वर्षांत प्रकरणे निकाली काढण्यासाठी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प, उपजिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न करीत आहेत. विभाग शासनाकडे अनुदान मागणी करीत असला तरी अनुदान तातडीने मिळत नसल्याचे दिसते आहे. वाढीव दराने रक्कम मिळावी, यासाठी न्यायालयात अनेकांनी धाव घेतली आहे. यातूनच जीएमआयडीसी, कडा, जिल्हाधिकारी कार्यालय खुर्ची व इतर साहित्य जप्तीची नामुष्की वारंवार ओढवते. 

मागील काही वर्षांमध्ये जायकवाडी प्रकल्पांतर्गत सरळ खरेदीने, भूसंपादन कायदा २०१३ नुसार शेतकऱ्यांकडून जमिनी घेण्यात आल्या. जप्ती, लोकअदालतमध्ये अजूनही तडजोडीची प्रकरणे सुरू असून न्यायालयातही अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, खुलताबाद  व इतर तालुक्यांतील १०० हून अधिक प्रकरणात अनुदान दिलेले नाही.

...अन् वारसांचे हेलपाटेवडील गेल्यानंतर शेतीच्या सातबाऱ्यावर मुलांची नावे लागली. परंतु, प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना वडिलांचे नाव पाटबंधारे व इतर विभागाच्या संचिकांमध्ये असल्यामुळे मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

न्यायप्रविष्ट प्रकरणांची संख्या अशी...उच्च न्यायालयातील प्रकरणे     रिट याचिका    २३    प्रतिज्ञापत्र संख्या    २१    अवमान याचिका    ९जिल्हा न्यायालयातील प्रकरणे    एकूण प्रकरणे    ५    प्रतिज्ञापत्र संख्या    ४

कमी-जास्त पत्रकांची संख्या ८२४ आहे. त्यातील ७४३ प्रकरणे सातबारावर घेतली आहेत. सरळ खरेदीच्या २७ प्रकरणांत कार्यवाही सुरू असून, नवीन भूसंपादन कायद्यानुसार ७ कोटी ६१ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

निधी मागणी केलेली प्रकरणे  रोजगार हमी योजना    ६४ प्रकरणे    ₹४ कोटी ६२ लाख ८६ हजार ९६९रोहयो वगळून    ३६ प्रकरणे    ₹७ कोटी ७४ लाख ५७ हजार ९३७एकूण प्रकरणे    १०० प्रकरणे    ₹१२ कोटी ३३ लाख ७४ हजार ४९०न्यायालयात जमा केलेला निधी  :  ₹४ कोटी ६२ लाख ८६ हजार ९६९ 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणFarmerशेतकरी