लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयावर सोयी-सुविधा, यंत्रसामुग्रीच्या प्रतीक्षेबरोबर पाण्याचे संकटही उभे आहे. दररोज दोन लाख लिटर पाण्याची मागणी राहणाºया या रुग्णालयाला पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपुºया पाण्यामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय महिनाभरात कार्यान्वित करण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे. रुग्णालयासाठी पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने पाणीपुरवठ्यासाठी १६ लाख आणि भाडेपट्टीपोटी १६ लाख रुपये महानगरपालिका प्रशासनाकडे भरले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी जोडणी मिळाली. दोनशे खाटांच्या या रुग्णालयासाठी ४ इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली. या जलवाहिनीद्वारे अत्यंत कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाणी घेण्याची नामुष्की ओढवणार आहे. त्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. ही परिस्थिती दूर करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांचे प्रयत्न सुरू आहेत.
सामान्य रुग्णालयावर पाणी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:13 IST