परभणी : गावपातळीवरील दैनंदिन पाणी शुद्धीकरण जैविक, रासायनिक पाणी तपासणीच्या नमुन्याचे संकलन करून ते आरोग्य सेवकास देणे, ब्लिचिंग पावडरच्या नमुन्याचे प्रयोग शाळाकडून तपासणी करून घेणे आदी कामांसाठी जलसुरक्षकांना प्रोत्साहन मानधन देण्यात येते. त्या त्या पं़ स़ ना २९ लाख ८१ हजार १२० रुपये एवढी रक्कम वाटप करण्यात आली आहे. गावपातळीवरील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखण्यासाठी जलसुरक्षकांना विशिष्ट जबाबदाऱ्या ठरवून देण्यात आल्या आहेत. या कामाच्या मोबदल्यात त्यांना त्या त्या कामानुसार मानधन दिल्या जाते. दूषित पाणी आढळल्यास आरोग्य सेवकाने संंबंधितांना सांगणे गरजेचे असते. वर्षात चार वेळा जैविक तपासणीसाठी पाणी नमुने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवावे लागतात तसेच वर्षातून दोनवेळा रासायनिक तपासणी, पाणी नमूने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवावे लागतात. खरेदी केलेल्या टीसीएल पावडरचे नमुने तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे द्यावे लागतात यासह आदींसाठी जलसुरक्षारक्षकांना प्रोत्साहनपर मानधन दिल्या जाते. पंचायत समितीकडून ग्रामपंचायतींना जलसुरक्षा रक्षकाच्या मानधनापोटी दिलेला निधी ग्रामपंचायतींनी ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यात जमा करून जलसुरक्षकांना तत्काळ मानधन वितरित करावे, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. करडखेडकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय वाटप निधी जलसुरक्षकांच्या मानधनापोटी परभणी पंचायत समितीस ५ लाख ४४ हजार ६८० रुपये, गंगाखेड ३ लाख ४९ हजार ६००, मानवत १ लाख ९० हजार २८०, पालम २ लाख ४१ हजार २४० रुपये, पाथरी २ लाख ३१ हजार ८८० रुपये, ३ लाख ३८ हजार ३६०, सेलू ३ लाख ३१ हजार ९२०, सोनपेठ २ लाख २ हजार ६४० रुपये, जिंतूर पंचायत समिती ५ लाख ५० हजार ५२० रुपये या प्रमाणे एकूण २९ लाख ८१ हजार १२० रुपये रक्कम राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पं.स. ला वितरित करण्यात आली आहे.
जलसुरक्षारक्षकांना मिळणार मानधन
By admin | Updated: July 12, 2014 01:12 IST