शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

अहमदनगर धरण समूहातील पाणी जायकवाडीकडे झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:07 IST

नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील एकत्रित विसर्ग दि. १४ ऑगस्टपासून  नांदूरमधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात  करण्यात येत आहे

ठळक मुद्देधरणाचा फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणारबुधवारी दुपारनंतर हे पाणी जायकवाडी धरणात पोहचेल

पैठण : नाशिक पाठोपाठ आता अहमदनगर धरण समूहातील पाणीजायकवाडी धरणाकडे झेपावले आहे. ओझर वेअर मधून मंगळवारी दुपारी प्रवरा नदीत ६३०१ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला असून गतीने पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाले आहे. बुधवारी दुपारनंतर हे पाणी नाथसागरात दाखल होणार आहे. मंगळवारी नाथसागरात १५५१६ क्युसेक्सने आवक सुरू होती, सायंकाळी धरणाचा जलसाठा ६७.७०%  एवढा होता.

नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील एकत्रित विसर्ग दि. १४ ऑगस्टपासून  नांदूरमधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात  करण्यात येत आहे. या पाण्यामुळे जायकवाडीच्या जलसाठ्यात जवळपास १२ % भर पडली आहे.  मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअर मधून प्रवरा नदीत ६३०१  क्युसेक्स क्षमतेने विसर्गास  दुपारी प्रारंभ करण्यात आला. हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले असून बुधवारी दुपारनंतर हे पाणी जायकवाडी धरणात पोहचेल असे जायकवाडीचे  कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग आज ६४५६ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला असून गोदावरी नदीतून येणारी आवक घटली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याने जायकवाडी धरणात आवक सुरू राहील असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदिप राठोड यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेस धरणाची पाणीपातळी १५१५.५८ फूट झाली होती. धरणात १५५१६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. धरणात एकूण जलसाठा २२०७.८५८ दलघमी तर उपयुक्त जलसाठा १४६९.७५२ दलघमी इतका झाला आहे.

धरणाचा फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणारजायकवाडी धरणाचा जलसाठा  वाढत असल्याने जायकवाडी प्रशासन सज्ज झाले आहे.  धरणाच्या बाबतीत जुने व्हिडीओ टाकून पाणी सोडण्यात आले अशा अफवा पसरविल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आज झालेल्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, धरणाचे फोटो व चित्रिकरण विनापरवानगी काढल्यास धरण सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद