शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेकडो दिंड्यांसह वारकऱ्यांचे पैठणमध्ये आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:43 IST

नाथषष्ठी सोहळा : नाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून दिंड्या राहुट्यात विसावल्या

पैठण : नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळमृदंगाचा खणखणाट अन् ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष करत उन, वाऱ्याची पर्वा न करता शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत दिंड्यांचे सोमवारी दुपारनंतर पैठण शहरात आगमन सुरू झाले. शेकडो दिंड्यांसह आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीने पैठणनगरी गजबजून गेली. शहरात दाखल होताच संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत नाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून दिंड्या आपापल्या राहुट्यात विसावत होत्या.पैठण शहरात दिंड्या मुक्कामी थांबण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने यंदा वारकºयांना चांगल्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाही यात्रा मैदानात नाथ मंदिरालगत असलेले रहाटपाळणे तेथून काढून तेथे प्राधान्याने वारकºयांच्या दिंड्या व राहुट्यांना जागा देण्यात आली तर रहाटपाळणे पार्किंग मैदानात हलविण्यात आले आहेत. वारकºयांनी गोदावरीचे वाळवंट, यात्रा मैदान, दत्त मंदिर परिसर व शहरभर राहुट्या व फड उभारले.नाथवंशजांकडून षष्ठीचे निमंत्रणसोमवारी नाथवंशजांच्या वतीने षष्ठी सोहळ्यात सहभागी व्हावे म्हणून पांडुरंग भगवंतास अक्षत (निमंत्रण) दिले गेले. याचप्रमाणे षष्ठीतील मानकरी नाथोपाध्ये, संतकवी, अमृतराय संस्थान, भगवान गड, ह.भ.प. अंमळनेरकर महाराज यांनाही नाथवंशजांकडून अक्षत देऊन निमंत्रण देण्यात आले.लक्ष्मी आईची पूजादुपारी नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी नाथ मंदिराच्या गोदावरी प्रवेशद्वारास लागून असलेल्या लक्ष्मीमातेची परंपरेनुसार पूजा केली. संत एकनाथ महाराज यांनी या लक्ष्मीमातेस बहिण मानले होते. षष्ठीचा सोहळा निर्विघ्न पार पडू दे, असे साकडे नाथवंशजांनी भगवान पांडुरंगासह लक्ष्मी देवीस घातले. लक्ष्मी आई माता यांची सर्व नाथवंशज मंडळींनी पूजा केली. यावेळी सुप्रिया गोसावी, अनुराधा गोसावी, मनवा गोसावी, सौख्यदा देशपांडे, योगिनी कुलकर्णी आदींसह नाथवंशज उपस्थित होते.आज निर्याण दिंडीमंगळवारी सकाळी ११वाजता षष्ठीची नाथवंशजांची निर्याण दिंडी गावातील नाथ मंदिरातून निघणार असून या दिंडीत अक्षत दिलेले सर्व मानकरी सहभागी होतात. दिंडी वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरात जाणार आहे. या ठिकाणी ‘अवघेचे त्रैलौक्य, आनंदाचे आता’ या अभंगावर कीर्तन होते.विविध शासकीय कार्यालये, दवाखाना यात्रा मैदानातवारकºयांना सेवा सुविधा देण्यासाठी यात्रा परिसरात नगर परिषदेने कार्यालय हलविले आहे. या कार्यालयातून सर्व सुत्रे हलविण्यात येत आहेत. तात्पुरते अस्थायी पोलीस कार्यालय सुध्दा यात्रा मैदानात स्थलांतरीत करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने यात्रा मैदानात दवाखाना सुरू केला आहे. पाण्याचे टँकरही यंदा मुबलक असल्याने सर्वांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले. मंदिरात दर्शन सुरळीत घेता यावे म्हणून संस्थानच्या वतीने संपूर्ण दर्शन रांगेस मंडप टाकण्यात आला आहे. सर्व दर्शन रांग सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवण्यात आली असल्याचे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक