शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा

By सुमित डोळे | Updated: November 4, 2023 18:23 IST

सासरकडील नात्यातीलच लोकांना दिली सुपारी, मोठ्या भावाची केली क्रूर हत्या

छत्रपती संभाजीनगर : बेगमपूर येथील लाल मंडीत राहणाऱ्या जगदीश फतेलष्कर (४२) यांचा बुधवारी मकाई गेट पुलाखाली संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला होता. त्यांचा उजवा पाय, मणका तुटेपर्यंत गंभीर मारहाण करून त्यांचा खून केल्याचे तपासात शुक्रवारी निष्पन्न झाले.

जगदीश यांना मुलीच्या लग्नात हातउसने दिलेल्या ३ लाखांच्या बदल्यात १० लाखांची मागणी करणारी लहान सख्खी बहीण रिना राजेश यादव (वय ३५) हिने अकोटच्या वसुलीबाजांना सुपारी देऊन जगदीश यांचा खून घडवून आणला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस अकोट येथे रिनासह मारेकऱ्यांचा शोध घेत होते.

किराणा चावडीत असणाऱ्या दुकानात काम करणारे जगदीश दोन मुले, पत्नी, आई, वडील, भाऊ व भावजयीसह राहात होते. त्यांचे कुटुंब परिसरातच मेस चालवते. आठ महिन्यांपूर्वी जगदीश यांच्या मुलीचे लग्न झाले. तेव्हा पैशांची गरज पडल्याने त्यांनी रिनाकडून ३ लाख रुपये घेतले होते. तेव्हा मदत म्हणून दिलेले पैसे रिनाने ३० टक्के व्याजासह परत मागितले. जगदीश पैशांसाठी प्रयत्न करत होते. मात्र, रिना हिने सासरकडील नात्यातीलच तरुण रितेश मंडले, रामलाल मंडले उर्फ यादव, त्याची आई रमा यांच्या मदतीने धमकावणे सुरू केले. ३१ ऑक्टोबर रोजी तिघांनी काही गुंडांसह त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. १ नोव्हेंबर रोजी पुन्हा दुपारी त्यांनी जगदीश यांचे घर गाठले. रितेश याने अचानक त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. आईलाही डोळ्यात तिखट टाकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोबत वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी जगदीश यांना बळजबरीने कारमध्ये नेले.

तिकडे भावाची हत्या, इकडे बहिणीचा बॉण्डमध्ये जीवरिना, रितेशच्या गुंडांनी जगदीश यांना अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. तर रिना, रितेश यांनी त्यांचा लहान भाऊ योगेशला घराचा ताबा घेण्यासाठी बॉण्ड करून दे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेले. तोपर्यंत जगदीश यांची हत्या करून गुंडांनी त्यांना मकाई गेट उड्डाणपुलाखाली फेकून दिले. तिकडे योगेशची सही होताच रिना बॉण्ड घेऊन पसार झाली. वर्दळीच्या परिसरात जगदीश यांचा मृतदेह फेकताना कोणीच कसे पाहिले नाही, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद