शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्कआॅर्डर’साठी इच्छुकांचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:03 IST

खुलताबाद ते म्हैसमाळ या ३८ कोटींच्या एमडीआरच्या (मेजर डिस्ट्रिक्ट रोड), तर हर्सूल-जटवाडा या २७ कोटींच्या रस्ते कामांच्या निविदांची चौकशी करण्यासाठी अमरावती आणि नागपूर विभागाच्या दोन मुख्य अभियंत्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद बांधकाम विभाग : ६५ कोटी रुपयांच्या कामासाठी चौकशी समितीवर दबाव आणण्याच्या हालचाली

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खुलताबाद ते म्हैसमाळ या ३८ कोटींच्या एमडीआरच्या (मेजर डिस्ट्रिक्ट रोड), तर हर्सूल-जटवाडा या २७ कोटींच्या रस्ते कामांच्या निविदांची चौकशी करण्यासाठी अमरावती आणि नागपूर विभागाच्या दोन मुख्य अभियंत्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी समितीच्या निर्णयानंतरच निविदांबाबत निर्णय होणार असून, वर्कआॅर्डर तातडीने मिळावी, यासाठी चौकशी समितीवर दबाव आणण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी अमरावती,नागपूरला हेलपाटे सुरू केल्याचे वृत्त आहे.चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे ६५ कोटींच्या निविदा मंजूर करण्याच्या हालचालींच्या तक्रारीवरून प्रधान सचिव आशिष सिंह यांनी निविदा प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. काही कंत्राटदारांनी ६५ कोटींच्या कामासाठी निविदा भरल्या होत्या; परंतु त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मंजूर केलेल्या निविदांची माहिती मागवून त्यामध्ये अपूर्ण कागदपत्रे असल्याची तक्रार केली. त्या तक्रारींच्या अनुषंगाने तथ्यशोधन समितीचे गठण करण्यात आले आहे. सदरील समिती जो निर्णय देईल, त्यानुसार निविदा मंजूर होतील अथवा फेरनिविदा काढल्या जातील.२४ मेपासून ‘लोकमत’ याप्रकरणी सातत्याने वृत्त प्रकाशित करीत आहे. प्रधान सचिव आशिष सिंह, सचिव सी.पी. जोशी यांनी वृत्ताची दखल घेत चौकशी समिती नेमली. सर्व कागदपत्रांची माहिती अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याकडून मागविली.कामासाठी स्थानिक युनिटची कागदपत्रेसार्वजनिक बांधकाम विभागाच्या ६५ कोटी रुपयांचे काम घेण्यासाठी पात्र ठरलेल्या कंत्राटदारांनी स्वत:चा प्लांट म्हणून सादर केलेली कागदपत्रे ही पैठण परिसरातील एका प्लांटची असल्याची माहिती पुढे आली आहे. सदरील प्लांटचालकाने शुक्रवारी बांधकाम विभागाला पत्र दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. सदरील प्लांटचालक तथा कंत्राटदाराला ते पत्र मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे वृत्त आहे. एकाच प्लांटच्या कागदपत्रांवर हेराफेरी करून कामे घेण्याचा हा प्रकार फसवणूक असल्याचे बोलले जात आहे. प्लांट विकत घेतल्याचा करार केल्यानंतर ६५ कोटींच्या कामाच्या निविदेत त्या प्लांटची कागदपत्रे जोडली.आता करार तुटल्यामुळे संबंधित प्लांटमालकाने बांधकाम विभागाला पत्र दिले आहे की, माझा आणि ६५ कोटींच्या काम घेतलेल्या कंत्राटदारांच्या व्यवहाराचा काहीही संबंध नाही. कारण मूळ प्लांटमालकाचे ३ कोटींचे बिल बांधकाम विभागाकडे अडकले आहे. त्या कामासाठी त्याने स्वत:च्या प्लांटची कागदपत्रे निविदेसोबत जोडली होती. ६५ कोटींची कामे घेण्यासाठी ज्याचे प्रयत्न होत आहेत ते कंत्राटदार पैठणच्या कंत्राटदाराला ३ कोटी देण्यास तयार असल्याची चर्चा आहे; परंतु तसे झाले, तर पैठणच्या कंत्राटदाराची पीडब्ल्यूडीची नोंदणी रद्द होऊ शकते. त्यामुळे त्या प्लांटचालकाने बांधकाम विभागाला पत्र दिले आहे.मुख्य अभियंता डेबेवार यांनी सांगितले...चौकशी समितीचे सदस्य तथा नागपूर विभागाचे मुख्य अभियंता यू.पी. डेबेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सोमवारी ६५ कोटी रुपयांच्या निविदांसंदर्भात बैठक होणार आहे. अमरावतीचे मुख्य अभियंतादेखील या चौकशी समितीमध्ये आहेत. सर्वंकष मुद्यांची छाननी केली जाईल. ज्या कायदेशीर बाबी असतील त्यांना धरूनच त्या कामांच्या निविदांची कागदपत्रे तपासली जातील. राजकीय दबावाखाली काहीही निर्णय होणार नाही.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागAurangabadऔरंगाबादMONEYपैसा