शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकच नाव, तेही सर्वमान्य; वाल्मिक सरवदे यांची पूर्णवेळ प्रकुलगुरुपदी निवड

By राम शिनगारे | Updated: February 10, 2024 11:54 IST

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांची २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरुपदी निवड केली होती.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पूर्णवेळ प्रकुलगुरुपदासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांचे नाव मांडले. त्यास सर्वच व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी मान्यता दिली. त्यानंतर विविध निवड समित्यांवर व्यवस्थापन परिषदेवर सदस्यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. त्याशिवाय आर्थिक विषयाच्या संदर्भात एक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांची २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरुपदी निवड केली होती. या निवडीस ४८ तास होण्यापूर्वीच त्यांचा पदभार काढण्याचे आदेश मुंबईत पोहोचल्यानंतर दिले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. त्याशिवाय आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनीही कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्या पुनर्नियुक्तीची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नियमित प्रकुलगुरूंच्या निवडीची विषय ठेवला होता. त्यात कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. सरवदे यांच्या नावाची शिफारस केली. त्यास सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली. डॉ. सरवदे यांना बैठक संपताच निवडीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी प्रकुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला.

विविध समित्यांवर सदस्यांची निवडव्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांतून महत्त्वाच्या खरेदी समितीवर ॲड. दत्ता भांगे यांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय परीक्षा मंडळावर प्राचार्यांतून डॉ. नवनाथ आघाव, डॉ. प्रशांत चौधरी, विद्यापीठातून डॉ. चंद्रकांत कोकाटे, महाविद्यालयातून डॉ. अशोक कोरडे यांची निवड केली. कुलसचिव व आजीवन संचालकांच्या निवड समितीवर डॉ. व्यंकटेश लांब, ग्रंथालय संचालकासाठी प्राचार्य डॉ. गौतम पाटील, परीक्षा संचालकासाठी डॉ. रविकिरण सावंत, नवोपक्रम संचालकासाठी डॉ. अपर्णा पाटील, उपपरिसर संचालकासाठी डॉ. अंकुश कदम यांची तर अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांची निवड केली आहे.

तंत्र व उच्च शिक्षण संचालकांची हजेरीकुलगुरू डॉ. फुलारी यांची पहिलीच बैठक असल्यामुळे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी पहिल्यांदाच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. प्रकुलगुरूंची निवड होणार असल्यामुळे कोणतीही गडबड होऊ नये यासाठीच संचालकांना वरिष्ठ पातळीवरून पाठविले. प्रकुलगुरूंचे नावही बंद लिफाफ्यात संचालकच घेऊन आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद