शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवलेला वाल्मीतील प्राध्यापक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 18:07 IST

२०१४ मध्ये मिळवली नोकरी

ठळक मुद्देया कारवाईनंतर लगेचच हायकोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. दीड वर्षापासून हे प्रकरण वाल्मीसह जलसंधारण विभागात चर्चेला होते.

औरंगाबाद : जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणारा प्रा. डॉ. वृषसेन पुरुषोत्तम पवार (रा. थेरगाव, जि. पुणे) याच्यावर जलसंधारण आयुक्त दीपक सिंघला यांनी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सोमवारी केली. 

दीड वर्षापासून हे प्रकरण वाल्मीसह जलसंधारण विभागात चर्चेला होते. सहा महिन्यांपूर्वीच डॉ. पवार याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. चौकशीअंती त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, हायकोर्टामध्ये वाल्मीने कॅव्हेटही दाखल केले आहे. जुलै २०१८ मध्ये डॉ. पवार याच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने वाल्मीत नोकरी मिळविल्याची ती तक्रार होती. २३ फेबु्रवारी २०१४ साली डॉ. पवार याने वाल्मीत सेवेत येण्यासाठी मुलाखत दिली होती. 

जलसंधारण आयुक्त सिंघला यांनी सांगितले, डॉ. पवार याला सेवेतून बडतर्फ केले आहे. दीड वर्षापासून ते प्रकरण सुरू होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने वाल्मीत नोकरी मिळविली होती. विज्ञान विभागात तो प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याने विनापरवाना दुसऱ्या, संस्थेत नोकरी मिळविली. चौकशीदरम्यान संपर्कात नव्हते. मध्यंतरी त्याने हायकोर्टात वाल्मीविरोधात याचिका दाखल केली होती. डॉ. पवार याने सादर केलेले मध्यप्रदेशमधील बरेच अनुभव प्रमाणपत्र बनावट होते. वाल्मीने याप्रकरणी त्याला नोटीस बजावली होती; परंतु त्याने त्याचे काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे सर्व चौकशीअंती त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीProfessorप्राध्यापकState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद