शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोबीघाट, स्वयंपाकगृह, डायलिसिस सेवांची खाजगीकरणाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:33 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील विविध सेवांची खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. राज्य पातळीवर सेवापुरवठादारांची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

घाटी : कंत्राटी कर्मचारी घेतल्यानंतर आता अन्य सेवांच्या खाजगीकरणाच्या हालचालीऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील विविध सेवांची खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. राज्य पातळीवर सेवापुरवठादारांची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे घाटीतील धोबीघाट, स्वयंपाकगृह, किडनी डायलिसिस सेवांचे खाजगीकरण होण्याची भीती कर्मचारी संघटनेतून व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) साफसफाईच्या कामासाठी दीड वर्षापूर्वी आऊटसोर्सिंगने ६० कर्मचारी घेतले. घाटीत मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. दिवसेंदिवस घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढत आहे. तुलनेत सोयी- सुविधांमध्ये वाढ होण्याची केवळ प्रतीक्षा करावी लागते. यंत्रसामुग्री, निधींसाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. परिणामी रुग्णसेवा देताना कसरत करण्याची वेळ प्रशासनावर येते.

अशा परिस्थितीत रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी विविध सेवांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.रुग्णांसाठी खानपान सेवा, रुग्णालय परिसरातील व आतील स्वच्छता, रुग्णांचे व रुग्णालयाचे आवश्यक कपडे धुणे, त्याची परीट घडी करणे आदी सेवा, किडनी डायलिसिस सेवा आणि क्ष-किरण, सिटी स्कॅ न, एमआरआय, सोनोग्राफी सेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने निविदा मागविल्या आहेत. घाटीत नवीन सिटी स्कॅन यंत्र नुकतेच दाखल झाले आहे. लवकरच नवीन एमआरआय यंत्र दाखल होणार आहे. त्यामुळे या सेवेचे खाजगीकरण होण्याची शक्यता नाही. मात्र, स्वयंपाकगृह, किडनी डायलिसिस, धोबीघाट यांचे खाजगीकरण होण्याची भीती आहे. कर्मचारी संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन खाजगीकरणाची निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

वरिष्ठ पातळीवरून प्रक्रियामुंबई येथूून यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. याविषयी अद्याप महाविद्यालय प्रशासनाला काहीही माहिती प्राप्त झालेली नाही. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरून होणार आहे.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

रुग्णांना फटकाघाटीत धोबीघाट, स्वयंपाकगृह, किडनी डायलिसिस सेवांचे खाजगीकरण होऊ शकते. या सेवांच्या ठिकाणी खाजगी कर्मचारी नेमले जातील. त्याचा रुग्णांना फटका बसेल. त्यामुळे महाराष्ट्रातून या निर्णयाला विरोध केला जात आहे.- रवींद्र दाभाडे, अध्यक्ष, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, (शाखा घाटी)-----------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य