शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरू, अहमदाबादसाठी ‘टेकऑफ’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:39 IST

औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू झाली  आहे.

ठळक मुद्देउद्योजक, व्यापारी, विद्यार्थ्यांचे लागले लक्षकोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी औरंगाबादहून बंगळुरू आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती.

औरंगाबाद : औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. आता बंगळुरू आणि अहमदाबाद विमानसेवेच्या ‘टेकऑफ’ची औरंगाबादकरांना प्रतीक्षा लागली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी औरंगाबादहून बंगळुरू आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती. आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणारे व नोकरी करणाऱ्यांसाठी ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरत होती. उद्योग, व्यापाराच्या दृष्टीने अहमदाबाद विमानसेवा फायदेशीर ठरत होती; परंतु कोरोनामुळे या दोन्ही विमानसेवा ठप्प झाली. 

औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. हैदराबादपाठोपाठ आता बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराला दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षा आहे. स्पाईज जेटकडून बंगळुरू, तर ट्रु जेटकडून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती. या दोन्ही कंपन्यांकडून औरंगाबादहून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होण्याची सध्या कोणतीही चिन्हे नाहीत; परंतु इंडिगोच्या माध्यमातून या दोन शहरांना लवकरच कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता आहे. या सेवेमुळे विभागातील अनेकांची सोय होणार आहे.उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, की मुंबईची सेवा रविवारपासून नियमित झाली आहे. आता रोज दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमान उपलब्ध झाले आहे. लवकरच बंगळुरू, अहमदाबादसाठीही विमान सुरू होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

९ हजार प्रवाशांचा प्रवासकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात औरंगाबादहून ४८९ विमान प्रवाशांची ये-जा झाली होती. त्यानंतर हळूहळू  प्रवाशांची संख्या वाढत गेली. सप्टेंबरमध्ये महिनाभरात तब्बल ९ हजार ३६३ प्रवाशांनी प्रवास केला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादairplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन